सोलापूर : व्यवहारात मालाची आवक वाढली की भाव कोसळतात, हे बाजारातील गणित यंदा कांद्याच्याबाबत मात्र खोटे ठरतेय. गेल्या काही महिन्यांपासून कांद्याची आवक कमालीची घटली आहे. परंतु तरीही कांद्याचा भाव कोसळलेच आहेत. कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हे चित्र दिसून येत आहे. प्रतिक्विंटल कांद्याला ८०० रुपये ते ११०० रुपये भाव मिळतो. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात असून लागवड खर्चही निघत नसल्यामुळे अस्वस्थ आहे. निर्यातबंदी असल्यामुळे कांद्याला उठाव नाही. त्याचा फटका मोठ्या प्रमाणामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. तसेच इतर देशातून येणारा कांदा आपल्या देशात येत आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील वर्षी याच ऑगस्ट महिन्यात सरासरी २००० ते २०५० गाड्यांची कांदा आवक होत होती. मात्र यंदाच्या वर्षी याच महिन्यात बाजारात कांदा शिल्लक असल्यामुळे जेमतेम ७५ गाड्या कांदा येत आहे. कांद्याची ७०२९ ते ६६१२ क्विंटल आवक होत आहे. यातून शेतकऱ्यांचा पदरात सरासरी ८०० रुपये ते ११०० रुपये भाव मिळत आहे.

या परिस्थितीचे कारण सांगताना बाजार समितीतील कांदा व्यापारी सादिक ऊर्फ सत्यम बागवान हे सांगतात की, गेल्या वर्षी बांगलादेशात दररोज २५० गाड्यांची कांदा आवक होत होती. सध्या भारतातून बाहेर जाणारा कांदा बंद आहे. तर दुसरीकडे इतर देशातून येणारा कांदा आपल्या देशात येत आहे. निर्यातबंदी असल्यामुळे कांद्याला उठाव नाही. त्याचा फटका मोठ्या प्रमाणामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे एकीकडे कांद्याची आवक कमी असूनही अपेक्षित भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

बार्शीतील रामा गायकवाड यांनी पाच एकरात कांद्याची लागवड केली होती. एकरी ४० ते ४५ हजार एवढा खर्च आला आहे. परंतु त्यांना लागवडीचाही खर्च मिळेनासा झाला आहे. गेल्या पाच-सहा दिवसांपासून ते दररोज दोन गाड्या भरून कांदा आणत आहेत. परंतु त्या तुलनेत कांद्याला भाव मिळत नाही. अहिल्यानगर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने सांगितलेली रडकथा अशीच आहे.