नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आता भाजपा आणि महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची ठरत आहे. सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे काँग्रेसने त्यांना पाठिंबा देण्यास नकार दिला आहे. याच कारणामुळे सत्यजित तांबे भाजपाला पाठिंब्यासाठी विचारणा करणार आहेत. तर दुसरीकडे भाजपाच्या नेत्या शुभांगी पाटील यांनीदेखील या मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांनी पाठिंब्यासाठी मातोश्रीकडे धाव घेतली आहे. महाविकास आघाडी शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच सर्व घडामोडींवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बघत राहा. योग्य वेळी तुम्हाला सर्व गोष्टी स्पष्ट होतील, असे सूचक विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. ते माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> सत्यजित तांबेंच्या उमेदवारीवर अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले “बाळासाहेब थोरातांना आधीच…”

योग्य वेळी तुम्हाला सर्व बाबी स्पष्ट होतील

शुंभागी पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली आहे. ठाकरे गट त्यांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे. यावर बोलताना “ठिक आहे. आपण योग्य वेळी त्यासंदर्भात खुलासा करू. बघत राहा. परिस्थितीवर नजर ठेवा. योग्य वेळी तुम्हाला सर्व बाबी स्पष्ट होतील,” अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

हेही वाचा >>> अशोक चव्हाणांनी पंकजा मुंडेंना दिला मोलाचा सल्ला, नाराजीच्या चर्चेवर बोलताना म्हणाले “कोणत्या घोड्यावर…”

मी निवडणूक लढवणारच- शुंभागी पाटील

शुभांगी पाटील यांनी ही निवडणूक मी लढवणार आहे, अशी भूमिका घेतली आहे. एक व्हिडीओ प्रदर्शित करून त्यांनी आपल्या भूमिकेबाबत सविस्तर सांगितले आहे. “विचित्र राजकारणाला आपण सामोरे जात आहोत. सामान्य घरातल्या मुलीने राजकारणात पुढे येऊच नये, असे काहींना वाटत आहे. राजाचा मुलगा राजा नाही बनणार. ज्याच्यामध्ये कसब आहे, तोच राजा बनणार. संपूर्ण महाराष्ट्राला माझे कर्तृत्व माहीत आहे. भाजपकडे मी अनेक दिवसांपासून उमेदवारी मागत होते. भाजपनेही माझे काम मान्य केले होते. पण राजाच्या मुलाला राजा बनविण्यासाठी माझे बलिदान देण्यात येत आहे. पण माझ्यासाठी माझे पदवीधर बांधव, डॉक्टर, शिक्षक यांनी घरोघरी जाऊन अर्ज भरले आहेत. त्यामुळे मी ही निवडणूक लढविणारच”, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा >>> पुणे शहराचे ‘जिजाऊ नगर’ नामांतर करावे का? अजित पवार यांनी मांडली भूमिका; म्हणाले “उगीचच…”

निवडणूक बिनवरोध होणार नाही- संजय राऊत

दरम्यान, नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी भाजपा, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नाहीत. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. ही निवडणूक बिनवरोध होणार नाही, असे आज (१४ जानेवारी) संजय राऊतांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजपा नेमका कोणत्या उमेदवाराला पाठिंबा देणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis said situation will clear soon regarding nashik graduate constituency election prd
First published on: 14-01-2023 at 14:57 IST