महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पक्ष महायुती किंवा महाविकास आघाडीत आहेत. भारतीय जनता पार्टी, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) आणि इतर लहान पक्ष महायुतीत आहेत. तर काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट) महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे निवडणूक लढणार आहेत. तसेच वंचित बहुजन आघाडी लवकरच महाविकास आघाडीत सामील होऊ शकते. परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसारखे काही पक्ष आहेत जे कोणत्याही युती किंवा आघाडीत सहभागी झालेले नाहीत. मनसे अद्याप स्वबळावर निवडणुका लढवत आली आहे. परंतु गेल्या काही महिन्यांपासून अधून मधून मनसे आणि भाजपाच्या युतीची चर्चा ऐकायला मिळते.

अलीकडच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही वरचेवर राज ठाकरे यांना भेटत असतात. त्यामुळेच मनसे महायुतीत सहभागी होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चालू आहे. या चर्चेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. फडणवीस यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीवेळी मनसे आणि राज ठाकरेंबरोबरच्या संबंधांवर भाष्य केलं.

Dudhganga tap water scheme,
इचलकरंजीची दूधगंगा नळपाणी योजना रखडल्याच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर राजू शेट्टी यांचे टीकास्त्र
Eknath Shinde on Uddhav Thackeray and Aaditya Thackeray
एकनाथ शिंदेकडे खरंच पैशांचं गोदाम? आदित्य ठाकरेंच्या आरोपांबाबत मुख्यमंत्री म्हणाले…
lok sabha election 2024 dcm devendra fadnavis slams uddhav thackeray in daryapur rally
सत्ता गेल्याने उद्धव ठाकरे भ्रमिष्ट! उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीसांची टीका
Chief Minister Eknath Shinde
“मला रोज फोन यायचे, साहेब त्यांना काहीतरी सांगा”; शिवतारेंच्या निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितला किस्सा

हे ही वाचा >> “निवडणूक आयोगाची मोठी चूक अन्…”, उज्ज्वल निकमांचं आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर मोठं वक्तव्य

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आगामी काळात मनसे कुठे असेल, कोणाबरोबर असेल ते वेळच सांगेल. आमची निश्चितपणे राज ठाकरे यांच्याशी मैत्री आहे. आमच्या भेटीगाठी होत असतात. आम्ही अनेक विषयांवर गप्पा मारतो. ते बऱ्याचदा काही चांगल्या सूचना करतात. कधीकधी आमच्यावर टीकाही करतात. परंतु, आम्ही एकत्र येऊन काम करू की नाही हे आत्ता सांगू शकत नाही. ही गोष्ट लवकरच आपल्याला संमजेल. अद्याप कोणीही त्यावर निर्णय घेतलेला नाही.

हे ही वाचा >> “निवडणूक आयोगाची मोठी चूक अन्…”, उज्ज्वल निकमांचं आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर मोठं वक्तव्य

काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनादेखील प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी असाच प्रश्न विचारला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच्या भेटीगाठींवर मनसे-भाजपा-शिवसेना युतीच्या अफवांबाबत विचारल्यावर राज ठाकरे म्हणाले होते, इथे भाजपाबरोबर जाण्याचा प्रश्न नाही, कोणीही कोणालाही भेटलं की युत्या होत नसतात. मागे एकदा बाळासाहेबांचं (शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे) पुस्तक प्रकाशित केलं तेव्हा मंचावर शरद पवार उपस्थित होते, म्हणजे लगेच आमची युती झाली का? तो तुम्हा प्रसारमाध्यमांच्या रोजच्या बुलेटिनचा भाग असेल, त्याचा आमच्याशी संबंध नसतो.