मागील काही दिवसांपासून ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. त्यांनी अलीकडेच महात्मा गांधी यांचा मारेकरी असलेल्या नथुराम गोडसेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला होता. त्यांच्या या कृत्याचा विविध राजकीय नेत्यांनी निषेध केला होता. ही घटना ताजी असताना गुणरत्न सदावर्ते यांच्या एका मोर्च्यात पुन्हा एकदा नथुराम गोडसेचे फोटो झळकले आहेत. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

खरं तर, एसटी कर्मचाऱ्यांच्या बँकेच्या निवडणुकीचं मतदान नुकतंच पार पडलं आहे. या निडणुकीची आता मतमोजणी केली जात आहे. यावेळी वकील गुणरत्न सदावर्ते हे आपल्या काही कार्यकर्त्यांसह मतमोजणीच्या ठिकाणी आले. यावेळी कार्यकर्त्यांच्या हातात विविध महापुरुषांचे फोटो होते. दरम्यान, गुणरत्न सदावर्ते यांच्यासह कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यामध्ये नथुराम गोडसेच्या नावानेही घोषणा देण्यात आल्या.

हेही वाचा- गुणरत्न सदावर्तेंनी पत्रकार परिषदेत झळकावला नथुराम गोडसेचा फोटो; म्हणाले, “नथुरामजी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एसटी कर्मचाऱ्यांच्या बँकेच्या निवडणुकीवर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ती एसटी कर्मचाऱ्यांची बँक आहे. त्याची निवडणूक झाली आहे. तिथे हा निवडून येतो किंवा तो निवडून येतो, याच्याशी आमचं काहीही देणं घेणं नाही. पण एवढं मात्र नक्की आहे की, या देशात नथुराम गोडसेचं उदात्तीकरण करणं योग्य नाही. या देशात महात्मा गांधींचाच विचार चालेल. गोडसेचा विचार चालू शकत नाही.”