धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करावा, या मागणीसाठी सुरू असलेल्या ‘धनगर समाज कृती समिती’च्या आंदोलनाला रविवारी हिंसक वळण लागले असून, बारामतीमध्ये समितीच्या कार्यकर्त्यांनी काही गाडय़ांच्या काचा फोडल्या. राहता येथे आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांच्या पुतळय़ाचे दहन करण्यात आले.
आरक्षणाच्या मागणीसाठी समितीच्या वतीने उपोषण सुरू करण्यात आले आहे. मात्र मागणी मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार आहे, असा इशारा समाजाच्या नेत्यांनी दिला. बारामतीमध्ये काही गाडय़ांच्या काचा फोडण्यात आल्याने तणाव निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. बारामती येथे भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी धनगर समाजाच्या भूमिकेस पाठिंबा देऊन काँग्रेस-राष्ट्रवादीने केवळ घोटाळे करून समाजाची फसवणूक केल्याचा आरोप केला.  दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी आदिवासींना न दुखवता धनगर समाजाला न्याय देणार असल्याचे सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धनगर समाज हा जन्माने आदिवासीच आहे, मात्र या सवलती देण्यास राज्य सरकार टाळाटाळ करीत आहे. घटनेने दिलेला न्याय्य हक्क आम्हाला मिळाला नाही, तर विधानसभा निवडणुकीत आघाडी सरकाराला चांगलाच धडा शिकवू.
– शालिग्राम होडगर,  धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhangar samaj aarakshan aandolan gets violent in baramati
First published on: 28-07-2014 at 01:10 IST