करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळांसाठी विद्यार्थी व पालकांना शालेय शुल्क मागणी संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. याविषयी तक्रार असल्यास आपल्या जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटद्वारे सांगितले आहे.  ट्विटबरोबर त्यांनी शासनाचे परिपत्रकही जोडले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा- Coronavirus : अर्थव्यवस्थेला फटका बसल्याने ठाकरे सरकारची खर्चाला मोठी कात्री

राज्यातील करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन जाहीर करण्यात आलेला आहे. बहुतांश पालकांनी या बंदीच्या कालावधीत शालेय शुल्क जमा करण्याचा कालावधी चालू वर्षाकरता तसेच आगामी वर्षाकरता म्हणजेच 2019-20 व 2020-21 साठी वाढवून देण्याची विनंती राज्य शासनाकडे केलेली आहे. राज्यातील करोनाची सध्याची परिस्थिती संपूर्ण हालचालींवर घालण्यात आलेली बंदी, पर्यायाने नागरिकांना भेडसवणाऱ्या अडचणी याबाबी विचारात घेता सर्व बोर्डाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना विनंती करण्यात आली आहे की, विद्यार्थी आणि पालकांकडून शाळेचे चालू वर्षाची व आगामी वर्षाचे शुल्क गोळा करताना सहानुभूतू दाखवणे आवश्यक राहील. लॉकडाउनच्या कालावधीत सदरचे शुल्क जमा करण्याबाबत सक्ती करण्यात येऊ नये. लॉकडाउनचा कालवधी संपल्यानंतर शालेय शुल्क जमा करण्याबाबतच्या सूचना संबंधितांना देण्याची कार्यवाही करावी.  या संबंधीचे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक 202003301812403321 असा आहे. असे परिपत्रकात नमूद आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dont be forced to pay school fees during lockdown varsha gaikwad msr
First published on: 17-04-2020 at 14:53 IST