करोना व्हायरस या महामारीमुळे देशभरात लॉकडाउन घेण्यात आला आहे. देशभरातील दोनशे जणांचा या महामारीनं बळी घेतला आहे. सर्वाधिक करोनाग्रस्त महाराष्ट्रात असून मुंबई आणि पुण्यातील संख्या जास्त आहे. त्यामुळे राज्यातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. मुंबई आणि पुण्यात रोजंदारासाठी गेलेले सर्व गावखेड्याकडे परतले आहेत. काही गावं तर गजबजली असली तरीही काही ठिकाणी अफवेमुळे भीतीचं वातावरण आहे. फेब्रुवारी संपला की लग्नसराईला सुरूवात होते. पण देशभरात लॉकडाउन असल्यामुळे भावी नवरदेवांच्या लग्नावर संक्रात आल्याचं दिसून येते. अनेकांना लॉकडाउनमुळे लग्नाची तारीख पुढे ढकलावी लागली. तर काहीजण शॉर्टकटमध्ये लग्न उरकत आहेत. इच्छुक नवरदेवांचं मात्र लॉकडाउनमुळे संबंध जोडण्यास अडचणी येत आहेत. लॉकडाउनमुळे वधुवर पक्षाची चांगलीच पंचाईत झाल्याचे दिसत असून अनेक भावी नवरदेवांना पुढच्या वर्षीचीच प्रतीक्षा कायम राहणार आहे. गावखेड्यात पूर्वी नोकरदार किंवा मुंबई-पुण्यात कामाला असणाऱ्या नवरदेवांना प्राधान्य दिलं जात असायचं. मात्र, आता करोना व्हायरसमुळे घरांघरांत मुंबई-पुण्याचा नवरा नको गं बाई अशा चर्चा सुरू आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लॉकडाउनमुळे दळणवळण बंद झाल्याने नवरा-नवरी पाहण्यासाठी येणाऱ्या पाहुण्यांची वर्दळ थांबली आहे. कांदापोह्याच्या (मुलगा-मुलगी पाहण्याचा कार्यक्रम) कार्यक्रमाला ब्रेक लागला आहे. ज्यांची लग्न जमली आहेत त्यांच्या तारखा पुढे ढकलण्याशिवाय पर्याय नाही. नाईलाजास्तव लग्न पुढे ढकलली जात आहेत. मात्र खरी पंचायत होतेय ती भावी लग्नालायक तरुण-तरूणींची, कारण त्यांना धड लग्न जुडविण्यासाठी चान्स नसल्याने व मुलगी पाहायलाही जाता येणार नसल्याने नवीन होणाऱ्या संबंधावर सावट पसरल्याचे दिसतेय.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dont want a husband in mumbai pune due to corona virus nck
First published on: 10-04-2020 at 11:07 IST