कुलगुरू डॉ. राजन वेळुकर यांच्याविरोधात काय पावले टाकायची, याचा निर्णय अ‍ॅडव्होकेट जनरलचा अहवाल आल्यानंतर राज्यपाल व कुलपतींकडून घेतला जाईल, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधान परिषदेत सांगितले.
त्यांच्या पीएचडीवरून उच्च न्यायालयाने फटकारल्याने आता वेळुकर यांचे कुलगुरुपद धोक्यात आले आहे. हा मुद्दा विधिमंडळात उपस्थित करण्यात आला. अ‍ॅडव्होकेट जनरलचे मत मागविल्यावर कुलपती योग्य निर्णय घेतील, असे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.