पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या नावे बनावट फेसबुक अकाउंट तयार करून युजर्सकडे पैसे मागितल्याचा प्रकार नुकताच घडला होता. याप्रकरणी त्यांनी अधिकृत फेसबुक पेजवर पोस्ट शेअर करत बनावट फेसबुक आणि आर्थिक फसवणूकीपासून सावध राहा अस म्हटलं होतं. या घटनेला पाच दिवस उलटून गेले असून पोलीस आयुक्तालयातील एका पोलीस उपनिरीक्षकाच्या नावे बनावट फेसबुक अकाउंट तयार करून युजर्स, मित्रांकडे पैसे मागितल्याचे प्रकरण पुन्हा समोर आलं आहे. त्यामुळे पोलिसांना कोणी आव्हान देत आहे का ? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचं गेल्या आठवड्यात फेसबुकवरील प्रोफाइल फोटोचा वापर करून बनावट अकाउंट तयार करण्यात आलं होतं. त्यावरून त्यांच्या मित्रांकडे आणि इतर फेसबुक युजर्सकडे दहा हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. हे समजल्यानंतर याप्रकरणी आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी अधिकृत फेसबुक पेजवर बनावट अकाउंटवरून पैसे मागितल्याचा फोटो आणि मजकूर पोस्ट केला होता. तसंच त्यांनी अशा बनावट फेसबुक अकाउंटपासून आणि आर्थिक फसवणुकीपासून सावध राहा असं म्हटलं होतं. संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली होती.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Duplicate facebook account of psi after police commissioner krishna prakash kjp 91 sgy
First published on: 28-10-2020 at 10:43 IST