राज्यात आज दिवसभरात १ हजार २९३ रूग्ण करोनामधून बरे झाले असून, ९८२ नवीन करोनाबाधित आढळले आहेत. याचबरोबर २७ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.

आता राज्यातील एकूण बाधितांची संख्या ६६,१९,३२९ झाली आहे. तर, आजपर्यंत राज्यात १४०४३० करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,३३,९९,३५५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,१९,३२९(१०.४४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १,३३,२६२ व्यक्ती गृहविलगिकरणात आहेत. तर ८६७ व्यक्ती संस्थात्मक विलगिकरणात आहेत. राज्यात आज रोजी एकूण १३ हजार ३११ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Corona Vaccination : महाराष्ट्राने गाठला १० कोटी लसीकरणाचा टप्पा ; आरोग्यमंत्र्यांनी केलं अभिनंदन!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट आता ओसरली आहे. दररोज आढणाऱ्या करोनाबाधितांच्या संख्येत घट होत असून, करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ सुरू आहे. तर, दुसरीकडे करोना प्रतिबंधात्मक लसीकरण देखील जोरात सुरू असल्याचं दिसून येत आहे. महाराष्ट्राने आज करोना लसीकरणात दहा कोटीचा टप्पा देखील गाठला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे.