राज्यात आज दिवसभरात ९६६ रूग्ण करोनातून बरे झाले असून, ९५६ नवीन करोनाबाधितांची नोंद झाली आहे. याचबसोबर, १८ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत एकूण ६४,६७,८७९ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.६४ टक्के एवढे झाले आहे.
आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,२४,३०० झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत १४०५८३ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,३९,७०,५८८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,२४,३०० (१०.३६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १,०२,२६८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १०१६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण १२,१९१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.