पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभाग घेण्यासाठी ई-पीक पाहणीची नोंद आवश्यक असल्याबाबत काही ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. त्यामुळे पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभाग घेण्यासाठी ई-पीक पाहणी नोंदीच्या दाखल्याची कोणतीही सक्ती करण्यात आलेली नाही, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ई-पीक पाहणीमध्ये पीक पेऱ्याची नोंद घेण्याची कार्यवाही १ ऑगस्ट पासून सुरू –

राज्यात २०२२-२३ या आर्थिक वर्षात प्रधानमंत्री पीकविमा योजना राबविण्यात येत आहे. चालू खरीप हंगामातील पिकांचा विमा घेण्यासाठी शेतकऱ्यांना ३१ जुलै २०२२ पर्यंत अर्ज करता येणार आहे. मात्र, योजनेत सहभागी होण्यासाठी ई-पीक पाहणीतील नोंद सक्तीची असल्याने योजनेत सहभाग घेता येत नसल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. पण, अशी कोणतीही सक्ती नाही. शेतकऱ्यांना पिकाचे स्वयंघोषणापत्र जोडून पीकविमा योजनेत सहभागी होता येईल. राज्य सरकारच्या ई-पीक पाहणीमध्ये पीक पेऱ्याची नोंद घेण्याची कार्यवाही १ ऑगस्ट २०२२ पासून सुरू होत आहे, त्या वेळी आपल्या पिकाची नोंद करावी, असेही कृषी विभागाने कळविले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: E crop inspection record is not mandatory for crop insurance pune print news msr
First published on: 17-07-2022 at 12:32 IST