पश्चिम महाराष्ट्रात साताऱ्यामधील काही भागांमध्ये सकाळी ९.१६ मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने दिली आहे. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३.३ इतकी नोंदवण्यात आली आहे. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोयना धरणापासून १० किलोमीटरच्या परिसरातील भागामध्ये हा सौम्य धक्का जाणवला. यामुळे कोणतीही हानी किंवा धोका निर्माण झाला नसल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये अद्याप कोणतीही जीवित तसेच वित्तहानी झालेली नसल्याची माहिती पाटण महसूल विभागाकडून देण्यात आली आहे. मात्र, गेल्या २ महिन्यामध्ये कोयना धरण परिसरात बसलेला भूकंपाचा हा तिसरा धक्का असल्यामुळे स्थानिकांमध्ये भिती आणि चिंतेचं वातावरण वाढू लागलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Earthquake in maharashtra of magnitude 3 3 on the richter scale hit kolhapur satara pmw
First published on: 23-05-2021 at 10:40 IST