तब्बल ९ तास चौकशी आणि छापेमारी केल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले. ईडीच्या या कारवाईनंतर शिवसैनिकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. तर ईडीने ताब्यात घेतल्यानंतर आम्ही झुकणार नाही. महाराष्ट्र कमजोर होत आहेत. मी शेवटपर्यंत शिवसेनेत राहणार. माझ्यावर करण्यात आलेले आरोप खोटे आहेत, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली. दरम्यान, राऊतांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांचे बंधू सुनिल राऊतांनीही माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊतांच्या मैत्री या बंगल्यात ईडीने नेमके काय काय केले, याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

हेही वाचा >> Ujjwal Nikam : संजय राऊतांपुढे आता कोणते पर्याय? ईडी काय करणार?

jayant patil praful patel
“शरद पवार भाजपाबरोबर येण्यास ५० टक्के अनुकूल होते”, पटेलांच्या दाव्यावर जयंत पाटील म्हणाले, “त्यांना पक्षसंघटना…”
Ganpat Gaikwad supporters support Shrikant Shinde in Kalyan East
कल्याण पूर्वेत गणपत गायकवाड समर्थकांचा श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा
CJI DY Chandrachud
“एवढ्याश्या कारणावरून मला ट्रोल केलं जातं…”, सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सांगितली व्यथा
eknath khadse along with wife and son in law granted bail in Bhosari land scam
भोसरी भूखंड घोटाळ्यात एकनाथ खडसे यांच्यासह पत्नी आणि जावयाला जामीन मंजूर

“संजय राऊत झुकणार नाहीत. त्यांच्यावर जी कारवाई झाली ती चुकीची आहे. संजय राऊत अटकेला तयार आहेत. खोट्या आरोपाखाली त्यांना फासावर लटकवलं तरी ते झुकणार नाहीत. ते शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेना सोडणार नाहीत. संजय राऊत आणि त्यांचे कुटुंबीय शेवटच्या क्षणापर्यंत उद्धव ठाकरेंसोबत राहतील,” असे सुनिल राऊत म्हणाले.

हेही वाचा >> संजय राऊतांवरील कारवाईनंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “लज्जा, शरम…”

“त्यांनी मैत्री बंगल्यामध्ये तपास केला. माझ्या तिन्ही फ्लोअरची तपासणी केली. जेवढे कागदपत्रं हवे होते, तेवढे त्यांनी घेतले आहेत. आम्ही ती कागदपत्रे त्यांना अगोदरच दिली होती,” अशी माहिती संजय राऊत यांचे बंधू सुनिल राऊत यांनी दिली आहे.

हेही वाचा >> NIAची देशभरात मोठी कारवाई! ६ राज्यांत १३ ठिकाणांवर छापे; नांदेड, कोल्हापुरातून २ संशयितांना अटक

ईडीने ताब्यात घेतल्यानंतर संजय राऊत काय म्हणाले?

“जी कारवाई व्हायची ती होऊ दे, मी घाबरत नाही. राजकीय सुडापोटी हा सर्व खेळ सुरू आहे. माझा पक्ष माझ्या पाठीशी आहे. उद्धव ठाकरे, शिवसैनिक यांचं माझ्यामागे बळ आहे. संजय राऊतला शिवसेनेमुळे राज्य व देश ओळखतो. संजय राऊत कधीच गुडघ्यावर चालत नाही, सरपटत नाही. निधड्या छातीने उभा राहतो आणि लढतो. त्यामुळे या कारवाईला देखील मी निधड्या छातीने सामोरं जाणार आहे. यातूनच महाराष्ट्राला बळ मिळेल,” अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी ईडीच्या कारवाईनंतर दिली.