राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील आज (२२ मे) सकाळी ११ वाजता ईडी कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहणार आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस (आयएल अॅण्ड एफएस) गैरव्यवहार प्रकरणी जयंत पाटील यांना समन्स बजावण्यात आले होते. ते ईडी कार्यालयात हजर राहण्यापूर्वीच राष्ट्रवादीच्या मुंबई कार्यालयाबाहेर जयंत पाटलांच्या समर्थकांनी जयंत पाटलांच्या नावाने घोषणाबाजी करायला सुरुवात केली आहे.सांगलीहून काही कार्यकर्ते मुंबईत आले असून काही कार्यकर्ते सांगली येथेच ईडी आणि भाजपाविरोधात तीव्र आंदोलन छेडणार आहेत.

जयंत पाटील राज्याचे माजी गृह आणि माजी अर्थमंत्री आहेत. तसेच ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. सातवेळा ते आमदार म्हणून निवडून आले आहेत. पाटील यांना शुक्रवारी सकाळी जबाब नोंदवण्यासाठी ईडीने बोलावले होते. पण त्यांनी या समन्सबाबत ईडीला पत्र लिहून वेळ मागून घेतली होती. त्यानुसार ईडीने जयंत पाटील यांना आठवड्याभराची मुदत दिली आहे. पाटील यांना ईडीने दुसरे समन्स बजावले असून त्यात २२ मे रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे. आयएल अॅण्ड एफएसने दिलेल्या संशयास्पद कर्जप्रकरणी पाटील यांची ईडी चौकशी करणार आहे.

NCP politician Chhagan Bhujbal pulled out of Nashik LS race
भुजबळ यांच्या माघारीमुळे समता परिषदेचे राज्य नेतृत्वावर प्रश्नचिन्ह -बैठकीत उमेदवारी करण्याचा आग्रह
thane, Jitendra Awhad, mumbai High Court, quash the FIR
गुन्हा रद्द करण्यासाठी जितेंद्र आव्हाड उच्च न्यायालयात
Damania plea
दोषमुक्तीविरोधात दमानिया यांच्या याचिकेची उच्च न्यायालयाकडून दखल, भुजबळ कुटुंबीयांना नोटीस बजावून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश
Ramdas Athawale
तर भाजपसोबत माझी ‘ए’ टीम : रामदास आठवले

इस्लामपूरचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर ईडी आणि भाजापाविरोधात आंदोलन पुकारले आहे. जयंत पाटलांच्या नावाने घोषणाबाजी करण्यात येत असून जयंत पाटलांच्या मुंबईतील घराबाहेर बॅनरबाजीही करण्यात आली आहे.

हेही वाचा >> सांगली : जयंत पाटील सोमवारी ईडी कार्यालयात जाणार; जिल्ह्यातील कार्यकर्ते आंदोलन करणार

काय आहे प्रकरण?

आयएल अॅण्ड एफएस कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार व संशयास्पद कर्जाचे वाटप केल्याचा आरोप आहे. ईडीने याप्रकरणी आयएल अॅण्ड एफएसचे दोन माजी लेखापाल व त्यांचे सहाय्यक यांच्याशी संबंधित ठिकाणांवर गेल्या आठवड्यात शोध मोहिम राबवली होती. दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने २०१९ मध्ये दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या आधारावर याप्रकरणी चौकशीला सुरुवात केली होती. यापूर्वी ऑगस्ट २०१९ मध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही ईडीने या प्रकरणी चौकशी केली होती. २००५ मध्ये ठाकरे, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा मुलगा उन्मेष आणि बांधकाम व्यावसायिक राजन शिरोडकर यांनी कोहिनूर मिल क्र. ३ आणि कोहिनूर सीटीएनएलची स्थापना केली. ठाकरे तीन वर्षांतच या प्रकल्पातून बाहेर पडले होते. आयएल अॅण्ड एफएस यांनी विविध कंपन्या व संस्थांना दिलेल्या कर्जांबाबत ईडीला संशय आहे. त्याबाबत आता तपास सुरू आहेत. आयएल अॅण्ड एफएस या कंपनीने २०१८ मध्ये दिवाळखोरीसाठी अर्ज केला होता.