जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे मंगळवारी दहशतवाद्यांनी केलेल्या बेछूट गोळीबार केला. या हल्ल्याचा सध्या जगभरातून निषेध केला जात असून यामध्ये २६ जणांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यू झालेल्या नागरिकांमध्ये एका स्थानिक तरुणाचा देखील समावेश आहे. पहलगामच्या बेस कॅम्पवरून पर्यटकांना घोड्यावरून बैसरन पर्वत रांगामध्ये घेऊन जाण्याचे काम आदिल करत असे.
जेव्हा दहशतवाद्यांनी हल्ला केला, तेव्हा पर्यटकांना वाचविण्यासाठी तो थेट दहशतवाद्यांशी भिडला, त्याने दहशतवाद्याची बंदुक हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र यात त्याला जीव गमवावा लागला. यानंतर त्याच्या कुटुंबावर संकट कोसळलं आहे. कारण पर्यटकांना घोड्यावरून नेण्याचे काम करणारा आदिल हा त्याच्या घरातील एकमेव कमावता व्यक्ती होता, असं त्याच्या कुटुंबियांनी सांगितलं आहे. दरम्यान या संकटात सापडलेल्या आदिल शाह याच्या कुटुंबासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धावून आले आहेत. उममुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आदिल यांच्या कुटुंबाला पाच लाख रुरयांची आर्थिक मदत केली आहे.
पहलगाम येथे पर्यटकांवरील हल्ल्याप्रसंगी पर्यटकांचे रक्षण करताना मृत्युमुखी पडलेल्या सय्यद आदिल हुसैन शाह या स्थानिक युवकाच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त करतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेयांनी वैयक्तिकरित्या सय्यदच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत केली आहे.
पहलगाम येथे पर्यटकांवरील हल्ल्याप्रसंगी पर्यटकांचे रक्षण करतांना मृत्युमुख्यी पडलेल्या सय्यद आदिल हुसैन शाह या स्थानिक युवकाच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त करतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री @mieknathshinde यांनी वैयक्तिकरित्या सय्यदच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत केली आहे. pic.twitter.com/ROQ7TdiYNA
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 25, 2025
“पहलगाम येथे पर्यटकांवरील हल्ल्याप्रसंगी पर्यटकांचे रक्षण करताना मृत्युमुखी पडलेल्या सय्यद आदिल हुसैन शाह या स्थानिक युवकाच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त करतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैयक्तिकरित्या सय्यदच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत केली आहे,” अशी पोस्ट महाराष्ट्र शासनाच्या डीजीआयपीआरच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून करण्यात आली आहे.