Eknath Shinde Challenged Sharad Pawar : विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मते मिळूनही आम्हाला कमी जागा मिळाल्या, असा दावा करणाऱ्या शरद पवारांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएमचा घोटाळा नसतो का? असा सवाल एकनाथ शिंदेंनी विचारला.

“या पूर्वी झारखंडमध्ये मतदान झालं, कर्नाटकात झालं. लोकसभेच्या निवडणुका झाल्या. आता प्रियांका गांधी देखील जिंकल्या. म्हणजे जेव्हा आपण हरतो तेव्हा ईव्हीएम घोटाळा म्हणायचं. जेव्हा आपण जिंकतो तेव्हा ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरची मागणी कोणी करत नाही. हा दुटप्पीपणा आहे. विरोधी पक्षाकडे कोणताही मुद्दा राहिलाले नाही. मी आधीच म्हणालो विरोधी पक्षाला लाडकी बहीण चारीमुंड्या चित करेल. सर्व घटकांनी या राज्यातील विरोधी पक्षाला त्यांची जागा दाखवली. जनता घरी बसणाऱ्यांना मतदान करत नाहीत. काम करणाऱ्यांना मतदान करतात”, एकनाथ शिंदे म्हणाले.

“सर्वोच्च न्यायालयापासून निवडणूक आयोगापर्यंत विरोधी पक्षाने नेहमीच त्यांच्या बाजूचा निकाल लागला तेव्हा त्यांना चांगलं म्हटलं. त्यांच्याविरोधात निकाल लागला तेव्हा आक्षेप घेतला. सुप्रीम कोर्टावर आरोप केले. हे लोकशाहीला घातक आहे. या महाराष्ट्रात लोकशाही मार्गाने झालेल्या निवडणुका आहेत, महायुतीचं काम जनतेने पाहिलं. अडीच वर्षांत महाविकास आघाडीने बंद पाडलेले प्रकल्प, कल्याणकारी योजना सुरू केल्या. या योजनांचा परिपाक या कामांची पोचपावती या निवडणुकीत बघायला मिळेल. तसंच झालं. विरोधी पक्षाला माझं आव्हान आहे, रडगाणं थांबवा, रडगाणं बंद करा आणि विकासकामे सुरू करा”, असं आव्हानही एकनाथ शिंदे यांनी केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोकसभेत दोन लाखांचा फरक असून त्यांना जागा जास्त आल्या. त्यांचे जास्त उमेदवार जिंकून आले. आम्हाला १७ जागा आणि महाविकास आघाडीला ३१ जागा मिळाल्या. हा ईव्हीएम घोटाळा झाला म्हणायचा का? त्यावेळी त्यांनी काही आक्षेप घेतला नाही, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.