Eknath Shinde चंद्रहार पाटील यांनी आज एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रहार पाटील यांच्या हाती शिवसेनेचा झेंडा दिला. त्यानंतर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश झाला.  एकनाथ शिंदे म्हणाले, “ठाण्यातल्या घटनेत जे लोक जखमी झाले त्यांना मी भेटून आलो, विचारपूस केली त्यामुळे मला चंद्रहार पाटील यांच्या पक्ष प्रवेश कार्यक्रमात यायला थोडा उशीर झाला. आज डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश झाला हे मी जाहीर करतो आणि त्यांचं स्वागत करतो” असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

चंद्रहार पाटील कुटील माणसांकडून स्वच्छ माणसांकडे आले आहेत-एकनाथ शिंदे

चंद्रहार पाटील हे नकली आखाड्यातून असली आखाड्यात आले आहेत. पाटील तुम्ही कुटील माणसाकडून स्वच्छ मनाच्या माणसाकडे आला आहात. हा हॉल नाही तर आखाडा झाला आहे त्यामुळे पैलवानांच्या शिट्ट्या तर ऐकू येणारच असंही एकनाथ शिंदे म्हणाले. चंद्रहार पाटील तुम्हाला एकच सांगतो तुम्ही आमच्याकडे आला आहात आता यापुढे ज्याची होणार नाही हार तो तुमचा आवडता डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार. चंद्रहार पाटील आम्हाला सगळ्यांना तुमचा अभिमान आहे असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

मी पैलवान नाही पण २०२२ ला सगळ्यांना चारी मुंड्या चीत केलं-एकनाथ शिंदे

कुस्तीत अनेक डावपेच असतात. मी कुस्तीतला पैलवान नसलो तरीही २०२२ समोरच्या सगळ्यांना चारी मुंड्या चीत केलं. असे डावपेच टाकले की अजून ते उठलेच नाहीत. पैलवान हे आपल्या महाराष्ट्राचं वैभव आहेत. त्यामुळे चंद्रहार पाटील यांच्यावर आता मोठी जबाबदारी आहे. अनिल बाबर यांनाही कधीच विसरता येणार नाही. अनिल बाबर माझ्या खांद्याला खांदा लावून सुरुवातीपासून बरोबर होते. मी महाराष्ट्राच्या बाहेर गेलो तरीही अनिल बाबर यांचे लोक मला भेटतात. अनिल बाबर यांनी देश व्यापून टाकला होता. अनिल बाबर आपल्यात नाहीत पण त्यांचे चिरंजीव सुहास आपल्या बरोबर आहेत. सांगलीची माणसं चांगलीच असतात, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाघाचं कातडं पांघरुन लांडगा कधीही वाघ होत नाही-एकनाथ शिंदे

मीदेखील शेतकऱ्याचा मुलगा आहे. मी शाखाप्रमुख होतो तिथपासून राज्याचा मुख्यमंत्री झालो हे अजूनही काही लोकांना पटत नाही. मी त्यांच्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना मोफत सुरु केला आहे. ज्यांना पोटदुखी झाली आहे त्यांनी तिकडे जावं आणि त्यांच्यासाठी व्यवस्था करुन ठेवली आहे. वाघाचं कातडं पांघरुन लांडगा कधी वाघ होत नाही. त्यासाठी बाळासाहेब ठाकरेंचे विचारच लागतात. ज्याने बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले त्यांना त्याची प्रचिती येते आहे. हा एकनाथ शिंदे सामान्य कार्यकर्ता आहे. हा पक्ष तुमचा आहे, इथे काही कुणी मालक नाही. राजा का बेटा राजा नहीं बनेगा असं श्रीकांत शिंदेही म्हणाले होते. आता सांगलीचा ढाण्या वाघ खऱ्या जंगलात आला आहे. असं म्हणत एकनाथ शिंदेंनी टोलेबाजी करत जोरदार भाषण केलं. ही शिवसेना हिंदूहृदय सम्राटांची आहे, टोमणे सम्राटांची नाही असाही टोला एकनाथ शिंंदेंनी लगावला.