गेल्या काही दिवसांपासून राज्यात मंत्रीमंडळ विस्तार आणि त्यानंतर खातेवाटप या दोन गोष्टींवरून जोरदार राजकीय चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं. आधी मंत्रीमंडळ विस्ताराला झालेला उशीर चर्चेत राहिला. त्यानंतर खातेवाटप लांबल्यामुळे विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका केली जात होती. अखेर राज्य सरकारकडून खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार शपथ घेतलेल्या १८ मंत्र्यांमध्ये खाती वाटण्यात आली आहेत.

मुख्यमंत्र्यांकडे १३ तर उपमुख्यमंत्र्यांकडे ८ खाती

खातेवाटपानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.

no permission for fodder camps to curb corruption
यंदा चारा छावण्यांना परवानगी नाही; भ्रष्टाचाराला लगाम घालण्यासाठी राज्य सरकारचा निर्णय? 
Freedom of press, right to dignity,
वृत्तपत्र स्वातंत्र्याचा वापर प्रतिष्ठेच्या अधिकाराचे उल्लंघन करण्यासाठी नको – उच्च न्यायालय
kirit somaiya
“…म्हणून काही तडजोडी केल्या”, किरीट सोमय्यांचं वक्तव्य चर्चेत; म्हणाले, “आता मविआ सरकार असतं तर…”
deepak kesarkar
माझ्या विरोधात गंभीर गुन्हा दाखल नाही! शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे स्पष्टीकरण

इतर मंत्र्यांकडे देण्यात आलेली खाती पुढीलप्रमाणे…

राधाकृष्ण विखे-पाटील – महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास

सुधीर मुनगंटीवार – वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय

चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य

डॉ. विजयकुमार गावित – आदिवासी विकास

गिरीष महाजन – ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण</p>

गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा व स्वच्छता

दादा भुसे – बंदरे व खनिकर्म

संजय राठोड – अन्न व औषध प्रशासन

सुरेश खाडे – कामगार

संदीपान भुमरे – रोजगार हमी योजना व फलोत्पादन

उदय सामंत – उद्योग

तानाजी सावंत – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण

रवींद्र चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

अब्दुल सत्तार – कृषी

दीपक केसरकर – शालेय शिक्षण व मराठी भाषा

अतुल सावे – सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण

शंभूराज देसाई – राज्य उत्पादन शुल्क

मंगलप्रभात लोढा – पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेलं खातेवाटप आता झालं असून यावरून राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.