मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदार आणि भाजपाचे काही नेते अलीकडेच गुवाहाटी दौऱ्यावर गेले होते. या गुवाहाटी दौऱ्यावर ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. शिंदे गटाच्या आमदारांना खूश ठेवण्यासाठी पुन्हा एकदा गुवाहाटीमध्ये प्रत्येकी पाच कोटी रुपये देण्यात आल्याचा आरोप खैरे यांनी केला. ही सर्व रक्कम बबड्या नावाच्या प्राण्याजवळ गोळा करण्यात आली होती, असा आरोपही खैरेंनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खैरेंच्या या आरोपानंतर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गुवाहाटीला गेल्यानंतर शिंदे गटातील आमदारांना प्रत्येकी पाच कोटी रुपये मिळाल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. यावेळी त्यांनी चंद्रकांत खैरेंचा एकेरी उल्लेख करत “तो माणूस बावचळला आहे, त्याला काहीही स्वप्न पडतात. त्यामुळे आम्ही त्यांच्या टीकेकडे फार लक्ष देत नाही” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय गायकवाड म्हणाले, “चंद्रकांत खैरे नावाचा बुड्ढा सठिया गया है. त्याला कधीही काहीही स्वप्न पडतात. आम्ही इकडे एवढे पैसे घेतले, आम्ही तिकडे तेवढे पैसे घेतले, असा आरोप ते करतात. पण आम्ही जाहीरपणे सांगतो की, आम्ही आमचा मुख्यमंत्री केला आहे. त्यामुळे आम्हाला पैसे मिळण्याचा काही संबंधच नाही. आम्ही इतर पक्षाचा मुख्यमंत्री केला असता तर हे आरोप आम्हीही मान्य केले असते. आम्ही काम करणारा मुख्यमंत्री निवडला आहे. तरीह चंद्रकांत खैरे बावचळल्यासारखी विधानं करतात. हा माणूस पिसाळला आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या आरोपांकडे फार लक्ष देत नाही. त्यांनी जे आरोप केलेत, तसा प्रकार कुठेही घडला नाही.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde group sanjay gaikwad on chandrakant khaire claim 5 crore get in guwahati visit rmm
First published on: 01-12-2022 at 19:59 IST