SC on Maharashtra Satta Sangharsh Updates : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाप्रकरणी सर्वोच्च न्यायालायने नुकताच निर्णय दिला. त्यानुसार, विधानसभा अध्यक्षांकडे १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय गेला आहे. तसंच, उद्धव ठाकरे यांनी स्वतःहून राजीनामा दिला असल्याने शिंदे सरकारही सुरक्षित राहिलं आहे. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज साताऱ्यातून महाविकास आघाडीवर टीका केली. शासन आपल्या दारी या कार्यक्रमात ते बोलत होते.

“अडीच वर्षाचं सरकार पाहिलं आणि नऊ महिन्यांचंही सरकार पाहिलं. शंभूराज देसाई तुम्ही अडीच वर्षांत खूप प्रयत्न केला. पण स्पीड ब्रेकर किती होते ते आपल्याला माहितीय. सातारा जिल्ह्यात २ हजार ४५ कोटींचा निधी सरकारने दिला. अडीच वर्षांत काय झालं हे आपल्याला माहिती आहे. पण दहा महिन्यांत काय केलं हेही आपल्याला माहितेय. अनेक रखडलेले प्रकल्प मार्गी लावले”, असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

आज साताऱ्यात जाताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं हेलिकॉप्टर बिघडलं. त्यामुळे त्यांचा नियोजित दौरा रद्द होण्याच्या मार्गावर होता. परंतु, तरीही त्यांनी साताऱ्यात हजेरी लावली. दुसऱ्या हेलिकॉप्टरने ते साताऱ्यासाठी रवाना झाले. यावरून एकनाथ शिंदे म्हणाले की, “अनेकजण मला म्हणाले की, हेलिकॉप्टर बिघडलंय कार्यक्रम सुरू करायला सांगा. परंतु, इकडे आलो नसतो तर तुमचं दर्शन मिळालं नसतं. शंभूराजचा सतत फोन चालू होता. बाकी दोन्ही मंत्र्यांना सारखे फोन येत होते. शेवटी किती काहीही झालं तरी या कार्यक्रमाला यायचंच होतं, ही जबरदस्त इच्छाशक्ती माणसाच्या मनात असते तेव्हा त्याला कोणीही आडवू शकत नाह आणि त्या ठिकाणी तो माणूस पोहचोतच पोहचतो, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

हेही वाचा >> Karnataka Election Results 2023 : कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदावरून वाद होतील का? संजय राऊत म्हणाले, “बंडखोरी करणारे…”

“काही लोक म्हणतात शेतकरी शेती करायला हेलिकॉप्टरने जातात का? पण, शेतकऱ्याच्या मुलाने हेलिकॉप्टरमध्ये बसू नये का? असा काही करारनामा केला आहे का? मुख्यमंत्री म्हणून हेलिकॉप्टरने आलो. कारण त्यामुळे माझे आठ तास वाचतात. गावी आल्यावर मी शेती आवर्जुन करतो. गावात येतो तेव्हा मी परिवारातील सदस्य म्हणून शेती करतो याचा मला अभिमान आहे”, असंही ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“सरकार पडणार, सरकार गडगडणार, सरकार कोसळणार असे अनेकजण मुहूर्त काढत होते. परंतु, ज्यांच्या पाठिशी हजारो लाखो लोकांचा, हजारो लाखो महिला भगिनींचा आशीर्वाद आहे त्यांचा बालबाका होत नाही. सुप्रिम कोर्टान काल त्यांना (ठाकरे गटाला) चांगली चपराक दिली. बेकायदेशीर, घटनाबाह्य म्हणणाऱ्या लोकांना कालबाह्य करून टाकलं”, असे शाब्दिक प्रहारही एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर केले आहेत.