पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर आयोजित इंडिया मोबाइल काँग्रेसच्या सहाव्या सत्राचे उद्घाटन पार पडले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 5G सेवेचाही शुभारंभ केला. दरम्यान, यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. 5G सेवेमुळे देशात क्रांती घडून येईल, असे ते म्हणाले.

हेही वाचा – संपूर्ण देशात 5G सेवा कधी उपलब्ध होणार? मुकेश अंबानी म्हणतात…!

नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?

“पुणे आणि मुंबई हे दोन शहरं 5G सेवेसाठी निवडण्यात आली आहेत. पनवेलच्या एका शाळेचाही त्यात समावेश आहे. याचा आम्हाला अभिमान आहे. 5G मुळे इंटरनेचा वेग वाढणार आहे. तसेच शैक्षणिक दर्जा सुधारण्यासही मदत होईल. एकंदरीत शिक्षण, वैद्यकीय, शेती, बॅंकींग यासह सर्वच क्षेत्रात एक आमुलग्राम बदल येत्या काळात दिसून येतील”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

हेही वाचा – PM Modi 5G Inauguration : नरेंद्र मोदींना स्वत: मुकेश अंबानी आणि आकाश अंबानी यांनी दिलं 5G सेवेचं प्रात्याक्षिक!

“अर्थव्यवस्थेलाही याचा मोठा फायदा होणार आहे. राज्याची अर्थव्यवस्था आपण १ ट्रिलियनच्या दिशेने नेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. देशाचा विचार केला, तर महाराष्ट्र आज देशात पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे. त्यामुळे या आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात होईल”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – 5G Launch in India : “इतिहासात १ ऑक्टोबरची नोंद सुवर्ण अक्षरात होईल”, 5G लाँच कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर आयोजित इंडिया मोबाइल काँग्रेसच्या सहाव्या सत्राचे उद्घाटन पार पडले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 5G सेवेचाही शुभारंभ केला. ही 5G सेवा येत्या दिवाळीपर्यंत एकूण १३ शहरांमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे. ज्या नागरिकांचा मोबाईल 5G सेवेसाठी तांत्रिकदृष्ट्या योग्य अर्थात 5G Enabled असेल, अशा नागरिकांना ही सेवा वापरता येईल. अहमदाबाद, बंगळुरू, चंदीगड, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, चेन्नई, लखनौ, पुणे, दिल्ली आणि मुंबई या शहरांमध्ये ही सेवा उपलब्ध करून दिली जाईल. त्यापैकी कोलकाता, दिल्ली, मुंबई आणि चेन्नई या शहरांमध्ये आधी सेवा सुरू केली जाईल.