शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी रविवारी सांगोला येथे घेतलेल्या सभेमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर कठोर शब्दांमध्ये टीका केली. यावेळी बोलताना त्यांनी स्थानिक आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावरही टीकास्त्र सोडलं. या टीकेला आता ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील’ फेम शहाजीबापू पाटलांनी जशास तसं उत्तर दिलं आहे. मी जर सोंगाड्या असेल तर विनायक राऊत काय नाच्या आहेत का? असा प्रश्न शिंदे गटातील आमदार असलेल्या शहाजीबापू पाटलांनी विचारला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या महाराष्ट्रात काळू-बाळूचा तमाशा सुरू असून ज्यांना राष्ट्रगीतासाठी नीट उभं राहता येत नाही, असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला आहे, अशी टीका शिवसेना नेते विनायक राऊत यांनी रविवारच्या आपल्या भाषणात केली. बाळासाहेबांच्या नावावर मतं मागणाऱ्या भडगुंज्या लोकांना राज्यातली जनता माफ करणार नाही, असंही विनायक राऊत फडणवीस यांच्यावर टीका करताना म्हणाले. “महाराष्ट्रात काळू-बाळूचा तमाशा सुरू आहे. ज्यांना राष्ट्रगीतासाठी नीट उभं राहता येत नाही, असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला आहे. हे मुख्यमंत्री राष्ट्रगीत सुरू असताना शर्ट खाली-वर करतात. हे आपल्या महाराष्ट्राचं दुर्देव आहे,” अशी टीका विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलताना केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde supporter mla shahajibapu patil slams shivsena mp vinayak raut scsg
First published on: 22-08-2022 at 08:08 IST