रेव्ह पार्ट्यांचे आयोजन केल्याच्या आरोपावरून युट्यूबर आणि ‘बिग बॉस ओटीटी २’चा विजेता एल्विश यादवविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह. एल्विश यादव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी वर्षा बंगल्यावर गणेशोत्सवानिमित्त गेला होता. यावरून राज्यातील विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. तर, राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केला आहे.

उत्तर प्रदेशमधल्या नोएडा शहरातील सेक्टर ४९ पोलीस ठाण्यात एल्विशविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात इतर पाच जणांना अटक झाली आहे. तसेच याप्रकरणी एल्विशला अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण एल्विश यादव मुंबईतच लपला असल्याचा दावा विजय वडेट्टीवार यांनी केलाय. तसंच, त्याला कोणाचंतरी आश्रय असल्याचंही ते म्हणाले. आज माध्यमांशी संवाद साधताना हे आरोप केले आहेत.

हेही वाचा >> एल्विश यादव प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया, विरोधकांना प्रत्युत्तर देत म्हणाले…

“एल्विश यादवने अत्यंत अश्लाघ्य भाषेत महिलांबाबत वक्तव्य केली आहेत. हा सेलिब्रिटी असला तरीही ड्रग्स माफिया आहे. नशेबाज आहे आणि अशी व्यक्ती मुंबईत लपली आहे. मुंबई पोलिसांनी त्याला तत्काळ अटक करावी. जर तो मुंबईत लपला असेल तर त्याला कोणाचे आश्रय आहे, अशा लोकांना आश्रय का दिला जातो”, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

“सराकारची काही गरिमा असते, प्रतिमा असते. शासकीय निवसस्थानी कोणालाही निमंत्रित करताना त्याची पार्श्वभूमी तपासली पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत कधीही वाईट ऐकलं नव्हतं, पण अशा लोकांना निमंत्रित करताना त्यांची तपासणी झाली पाहिजे”, असंही वडेट्टीवार म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुख्यमंत्री काय म्हणाले होते?

संजय राऊतांच्या या आरोपांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “विरोधकांना कामं काय आहेत? आम्ही कामं करतो, विरोधकांना काही काम उरलंय का? रोज आरोप करणं हेच विरोधकांना काम आहे. आम्ही कामातून उत्तर देतोय. त्यांनी बंद पाडलेले प्रकल्प सुरू करतोय. तुम्ही इगो ठेवून अनेक कामे बंद केली होती, असे राज्यकर्ते नसतात. अहंकारी वृत्तीने राज्य चालत नाही. त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. रोज सकाळी उठलं की त्यांना तेच काम आहे. रोज सकाळी उठलो की आम्ही कामं करतो”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.