सोलापूर : ‘माझे कुटुंब-तुमची जबाबदारी’ अशा पध्दतीने उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षे फेसबुक लाईव्ह द्वारे मुख्यमंत्रीपद उपभोगून कारभार महाराष्ट्राचा कारभार ठप्प केला. त्यांना सामान्य जनतेचे प्रश्न कशी समजणार, अशा शब्दांत भाजपचे नेते, सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी टीकास्र सोडले.

करमाळा येथील दिगंबर बागल कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी  माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष, आमदार सचिन कल्याणशेट्टी, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे, बागल गटाचे नेते विलास घुमरे आदी उपस्थित होते. मकाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष  दिग्विजय बागल व राज्य साखर संघाच्या संचालिका रश्मी बागल यांनी स्वागत केले.

हेही वाचा >>> उद्धव ठाकरे, अजित पवार, राहुल गांधी यांच्या बाबत काय म्हणाले भाजप खासदार?

शिंदे-फडणवीस सरकारच्या विकासाचा रथ जोरात दवडू लागला आहे, असा दावा करीत विखे-पाटील यांनी, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचाही कडक शब्दांत समाचार घेतला. पुणे जिल्ह्यातील पुढाऱ्यांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या तोंडातील हक्काचे पाणी स्वतःच्या जिल्ह्यासाठी पळवले. विशेषतः सोलापूर व नगर जिल्ह्याचे पाणी पळवले तरीही स्थानिक जनता त्यांनाच डोक्यावर घेऊन नाचत होती मात्र आता जनता हुशार झाली असून आपल्या हक्काचे पाणी मिळवण्यासाठी जागरूकता वाढली आहे.

हेही वाचा >>> फडणवीसांकडून कामांना स्थगितीचे गलिच्छ राजकारण; ठाकरे गटाचे नितीन देशमुख विधिमंडळात करणार उपोषण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

करमाळा तालुक्यातील आदिनाथ व मकाई या दोन्ही साखर कारखान्यांना शासनाचा आधार मिळण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी बोलताना दिग्विजय बागल यांनी दिगंबर बागल यांच्या अकाली निधन झाल्यानंतर राजकारणात आम्ही पोरके झाले असून आता इथून पुढे राधाकृष्ण विखे-पाटील, हर्षवर्धन पाटील व रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी आमचे पालकत्व घ्यावे अशी जाहीर  व्यासपीठावर हात जोडून विनंती केली. या विनंतीला उपस्थित बागल समर्थकांनी टाळ्याच्या कडक करून करून साथ दिली