scorecardresearch

सांगली : दारुसाठी उठला पित्याच्या जीवावर ; पैसे न दिल्याने केली हत्या

दारुसाठी तो निवृत्त सैनिक असलेल्या वडिलांकडे पैसे मागत होता. वडिलांनी दारुसाठी पैसे देण्यास नकार दिला.

सांगली : दारुसाठी उठला पित्याच्या जीवावर ; पैसे न दिल्याने केली हत्या
संग्रहित छायाचित्र

दारुसाठी पैसे दिले नाहीत म्हणून जन्मदात्या पित्याचाच लोखंडी तिपाई डोकीत मारुन खून करण्याचा प्रकार जत तालुक्यात कोसारी येथे घडला. याबाबत मिळालेली माहिती अशी, प्रमोद आप्पासो तोरवे (वय ३८) यांने दारुच्या नशेत वडिल आप्पासो कृष्णा तोरवे (वय ६८) यांच्या डोकीत माठ ठेवण्याच्या लोखंडी तिपाई मारुन गंभीर जखमी केले. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला.

शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास प्रमोद घरी दारु पिऊन आला. आणखी दारुसाठी तो निवृत्त सैनिक असलेल्या वडिलांकडे पैसे मागत होता. वडिलांनी दारुसाठी पैसे देण्यास नकार दिला. यामुळे संतप्त झालेल्या मुलाने लोखंडी तिपाई वडिलांच्या डोकीत मारली. यात त्यांचा मृत्यू झाला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Father killed by hitting iron tripod on head for not paying for liquor amy

ताज्या बातम्या