माझे पिता विलासराव देशमुख यांची मी मराठी चित्रपटात अभिनय करावा अशी खूप इच्छा होती. ‘लई भारी’ चित्रपटाच्या निमित्ताने हा योग आला असून वडिलांची इच्छा पूर्ण होत असल्याचे समाधान मिळत आहे, असे मत अभिनेता रितेश देशमुख याने येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. ‘लई भारी’ चित्रपट येत्या ११ जुलला प्रदíशत होणार असून त्यासाठी करवीरनिवासिनी महालक्ष्मीचे दर्शन घेण्यासाठी रितेश येथे आला होता.
रितेश देशमुख याने सांगितले, की यापूर्वी अनेकदा मराठी चित्रपटात काम करण्याची संधी आली होती. पण स्क्रीप्ट न आवडल्याने आलेल्या ऑफर नाकारल्या. लई भारीच्या निमित्ताने मनासारखी संधी मिळाली आहे. अॅक्शन, रोमान्स, सस्पेन्स याच्या प्रसंगाने ठासून भरलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल. आई व मुलाच्या कथेवर आधारित हा चित्रपट आहे. चित्रपट यशस्वी व्हावा यासाठी महालक्ष्मी चरणी प्रार्थना केली आहे.
चित्रपटाचे निर्माते जितेंद्र ठाकरे म्हणाले, ११ जुल रोजी एकाच दिवशी ४०० चित्रपटगृहांमध्ये चित्रपट प्रदíशत होणार असून तो एक विक्रम ठरणार आहे. सलमान खान या पाहुण्या कलाकाराचे मराठीतील डॉयलॉग आकर्षण ठरणार आहे. अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांना श्रेया घोषाल, अजय गोगावले, स्वप्नील बांदवडेकर, सोनु निगम, कुणाल गांजावाला या गायकांनी स्वरसाज चढवला आहे. चित्रपटाचा नायक सर्वाना भारी पडतो म्हणून चित्रपटाचे नाव चित्रपटाच्या नावात भारी या शब्दाचा वापर केला असून त्याला लई या कोल्हापुरी शब्दाचा टच देण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Father wish to do marathi film acting ritesh deshmukh
First published on: 06-07-2014 at 02:20 IST