अन्न आणि औषध विभागातर्फे शनिवारी सकाळी १०च्या सुमारास पेण शहरातील औषधांच्या दुकानांवर छापे टाकण्यात आले. पेणमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाने ठरवून दिलेल्या किंमतीपेक्षा जास्त दरात औषधांची विक्री केली जात असल्याच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. शासनाच्या औषध किंमत नियंत्रण आदेशातंर्गत काही औषधांच्या किंमती ठरवून दिलेल्या आहेत. विक्रेत्यांना ही औषधे निर्थारित किंमतीपेक्षा आधिक दराने विकता येत नाही. मात्र , पेणमध्ये निर्धारित दरांपेक्षा जास्त कर आकारून रुग्णांची लुट केली जात असल्याच्या अनेक तक्रारी होत्या. त्यामुळे अन्न आणि औषध विभागाकडून औषधांच्या दुकानावर धाडी टाकण्यात आल्या. यामध्ये पूजा मेडिकल या औषधाच्या दुकानातील औषधांचा साठा जप्त करण्यात आला. दरम्यान औषध विक्रेत्यांच्या संघटनांकडून याप्रकरणी दोषी आढळलेल्या दुकानांची मान्यता रद्द करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 3rd May 2014 रोजी प्रकाशित
पेणमध्ये औषधांच्या दुकानावर अन्न आणि औषध विभागाची कारवाई
अन्न आणि औषध विभागातर्फे शनिवारी सकाळी १०च्या सुमारास पेण शहरातील औषधांच्या दुकानांवर छापे टाकण्यात आले.
First published on: 03-05-2014 at 06:35 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fda raids on medical in pen city