पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या गटात तुफान हाणामारी झाली. राष्ट्रवादीचे माजी उपमहापौर डब्बू असवानी तर शिवसेनेचे तीन कार्यकर्ते जखमी झाले आहेत. पिंपरीत मतदान कमी व्हावे यासाठी दहशत माजवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असल्याचा आरोप डब्बू असवानी यांनी केला आहे. तर शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार यांनी राष्ट्रवादीला पराभव दिसत असल्याने त्यांनी हल्ला केल्याचा आरोप केला आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी एकमेकांविरोधात आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी बोलण्यास टाळाटाळ केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरीमधील माजी उपमहापौर आणि विद्यमान नगरसेवक डब्बू असवानी यांच्यावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप केला आहे. या घटनेत स्वतः असवानी किरकोळ जखमी झाले असून शिवसेनेतील तीन जण जखमी झाले आहेत. आज सकाळी डब्बू असवानी यांच्या कार्यालयाच्या बाहेर काही जण संशयितरित्या फिरत होते. काही वेळाने अज्ञात टोळक्याने डब्बू असवानी यांच्यावर हल्ला चढवला. तेव्हा, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली यात असवानी यांचे भाऊ आणि कार्यकर्त्यांना मारहाण झाली असून शिवसेने च्या तीन जण जखमी आहेत. यातील दोन गंभीर जखमी असल्याचे सूत्रांनी माहिती दिली आहे. दरम्यान, या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी बोलण्यास टाळाटाळ केली आहे.

“डब्बू असवानी यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला आहे. आमचे पाच कार्यकर्ते जखमी झाले आहेत. दहशतीचे राजकारण राष्ट्रवादीने सुरू केले आहे. त्यांना पराभव दिसत आहे, गुन्हा दाखल करणार आहोत. त्यांचे कार्यकर्ते जखमी कसे झाले नाहीत”.

 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fight between shivsena and ncp nagarsevak in pune scj
First published on: 21-10-2019 at 16:17 IST