महाराष्ट्र पोलिसांपेक्षा चित्रपटातील पोलीस बरे, असे वक्तव्य प्रसिद्ध अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांनी केले आहे. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला दोन महिने होत आले तरीही मारेकऱयांचा थांगपत्ता अजून लागलेला नाही. त्यामुळे अमरापूरकरांनी पोलीस प्रशासनावर नाराजीवर व्यक्त केली आहे.
अमरापूरकर म्हणाले, “दोन महिने होत आले तरी अजून पुणे पोलीस तपासच करत आहेत याला पोलिसांची निष्क्रियताच म्हणावी लागेल. गेले अनेक दिवस पुणे पोलीस आणि राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील स्वत: या प्रकरणी लक्ष घालून तपास करत आहेत असेच सांगण्यात येत आहे. त्याच्या पुढे तपास झालेलाच नाही”