रायगड जिल्ह्यातील उरण ओएनजीसी गॅस प्लांटमध्ये लागलेली भीषण आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला तीन तासानंतर यश आले आहे. या अग्नितांडवात चार जणांचा मृत्यू झाला असून, यात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या तीन जवानांचा समावेश आहे. गॅस प्लांटमध्ये सकाळी सात वाजेता ही आग लागली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रायगड जिल्ह्यातील उरण शहराजवळ ओएनजीसी गॅस प्लांट आहे. मंगळवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास प्लांटमध्ये आगीचा भडका उडला. सीएफयू दोन या भागात प्लांटच्या ड्रेनेज प्रोसेसिंग पाईपलाईनला लिक्विड गळतीमुळे आग लागली होती. आग लागल्यानंतर जेएनपीटी (जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट) आणि ओएनजीसीचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. ओएनजीसी, जेएनपीटीबरोबरचबीपीसीएल, महा जेनको, रिलायन्स आणि इतर अग्निशमन दलांनी आग विझवण्यास मदत केली. पाऊस सुरू असल्याने आग विझवण्याच्या कामात अडथळे येत होते. तब्बल तीन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलांच्या जवानांना यश आले आहे. दरम्यान, आग विझवताना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) गस्ती कारचा स्फोट होऊन सीआयएसएफचे तीन जवान आणि ओएनजीसीच्या एका कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू झाला आहे. एन.ए नायका, पासवान, एस.पी, खुशवा अशी मयत जवानांची नावे आहेत. ओएनजीसीचे निवासी प्लांट सुपरव्हायझर सी.एन, राव याचा आगीत मृत्यू झाला आहे. तर के.आर. महेश आणि सिंधु राज हे जखमी झाले आहेत.

आग लागल्यानंतर प्लांटमधून धूराचे मोठे लोळ बाहेर पडायला लागल्यानंतर परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. त्यामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवले होते. त्याचबरोबर ओएनजीसीच्या या प्रकल्पापासून एक किलोमीटरपर्यंत नागरिकांना प्रवेश बंद केला आहे. ओएनजीसीमध्ये करण्यात येणाऱ्या इंधर प्रक्रियेवर कोणताही परिणाम झालेला नाही. हाजिरा प्लँटमध्ये गॅस वळविण्यात आल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.

पाहा व्हिडीओ –

 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fire broke out in uran ongc gas plant three people injured bmh
First published on: 03-09-2019 at 08:36 IST