परंपरा मोडीत काढत तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन एका महिलेने देवीचे चरणस्पर्श करून पूजा केली. राज्याची कुलस्वामिनी मानल्या जाणाऱ्या तुळजाभवानी मंदिराच्या गर्भगृहात सर्वसामान्य महिलांना प्रवेश दिला जात नसे. मात्र, तुळजापूर शहरातीलच काही महिलांनी तुळजाभवानी देवीचा चरणस्पर्श केल्याने अनेक वर्षांची परंपरा मोडीत निघाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मंजुषा मगर असं या महिलेचे नाव असून, त्यांनी देवीच्या गर्भगृहात जाऊन देवीची पूजा करत अनेक वर्षांची परंपरा मोडीत काढली. त्यांच्यासोबत अन्य काही पाळीकर पुजारी महिलाही होत्या अशी माहिती आहे. आतापर्यंत देवीच्या पायाला हात लावून दर्शन घेण्याची लिखीत अनुमती नव्हती. या संदर्भात काही महिला जिल्हाधिकाऱ्यांना जाऊन भेटल्या. मंदिर संस्थांच्या कुठल्या रेकॉर्ड किंवा नियमात हे आहे का? याची विचारणा केली. त्यासंदर्भात नियम नाहीत हे लक्षात आल्यानंतर काल रात्री या महिला मंदिराच्या गर्भगृहात घुसल्या आणि देवीचा चरणस्पर्श केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First time womens enters in tuljapurs tuljabhavani temple
First published on: 06-01-2019 at 15:18 IST