साखरखान्याने पैसे थकवल्याने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाच शेतक-यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. सोमवारी सकाळी ही घटना घडली असून या पाच जणांमध्ये एका महिला शेतक-याचाही समावेश आहे. हे सर्वजण माढा तालुक्यातील उंदरगावचे राहणारे आहेत.हा प्रकार घडू लागताच तेथे असलेल्या पोलिसांनी त्वरीत हस्तक्षेप करून सर्व शेतकऱ्यांना ताब्यात घेतले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंढरपूर तालुक्यातील विजय साखर कारखान्याने शेतक-यांची ऊस बिलाची सुमारे २६ कोटींची रक्कम थकवली होती. यामुळे शेतकरी हतबल झाले होते. संतप्त शेतक-यांनी सोमवारी सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी यातील चौघांना ताब्यात घेतले असून पाचवा शेतकरी पळून गेला आहे, विजय साखर कारखाना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याशी संबंधित आहे. हा कारखाना खासगी तत्वावर उभारला असता लगेचच आजारी होऊन बंद पडला. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह इतर काही बँकांचीही कर्जे विजय साखर कारखान्याने थकविली आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Five farmers attempeted suicide in solapur
First published on: 17-10-2016 at 14:40 IST