इमारतीच्या पार्किंगमध्ये आग लागल्यानंतर लिफ्टच्या साह्याने खाली येत असताना आगीत होरपळून एकाच कुटूंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. नागपूरमधील गोकूळपेठ भागात गुरुवारी मध्यरात्री ही घटना घडली. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे.
अजिंक्य प्लाझा इमारतीच्या तळमजल्यावर आग लागल्यानंतर संपूर्ण इमारतीमध्ये धूर पसरला. यामुळे घाबरून गेलेल्या सिरिया यांच्या कुटुंबातील पाच जणांनी लिफ्टच्या मदतीने खाली येण्यास सुरुवात केली. मात्र, आगीमुळे लिफ्टच्या वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट झाले आणि लिफ्ट तळमजल्यावर आल्यावर बंद पडली. त्यानंतर आगीच्या झळांमध्ये होरपळून सिरिया यांच्या कुटूंबातील पाचही जणांचा मृत्यू झाला.
सलिला सरिया, त्यांची मुलगी श्रुती माळी, रागिणी सिरिया यांच्यासह सहाना व निरोश ही दोन मुले यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. दरम्यान, अग्निशामक दलाच्या बंबांनी तातडीने आग आटोक्यात आणून इमारतीमधील इतर रहिवाशांना सुखरूपपणे बाहेर काढल्यामुळे अन्य जीवितहानी टळली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Five members of family burnt alive in nagpur lift tragedy
First published on: 23-05-2014 at 12:10 IST