माजी मंत्री संजय देवतळे यांचे करोनामुळे निधन

पंधरा दिवसांपूर्वी देवतळे  यांना करोना झाला होता.

चंद्रपूर : राज्याचे माजी पर्यावरण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, वरोरा-भद्रावती विधानसभेचे सलग २० वर्षे नेतृत्व करणारे भाजप नेते संजय देवतळे (५८) यांचे रविवारी दुपारी  नागपुरातील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.पंधरा दिवसांपूर्वी देवतळे  यांना करोना झाला होता. त्यांना नागपुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. प्रकृतीत सुधारणा होत असतानाच शनिवारी सायंकाळी अचानक त्यांची प्रकृती बिघडली. प्राणवायूचे प्रमाण कमी झाले आणि रविवारी दुपारी २.१५ वाजताच्या सुमारास प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, जावई, भाऊ असा परिवार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Former minister sanjay devtale dies due to corona akp

ताज्या बातम्या