एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह शिवसेनेत सात-आठ महिन्यांपूर्वी बंड केलं. या बंडानंतर एकनाथ शिंदे यांच्या गटाला निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर शिंदे गटात आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. अशातच आता शिंदे गटातील धुसफूस समोर आली आहे.

माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्याकडे अकोला शिवसेना ( शिंदे गट ) संपर्कप्रमख पदाची जबाबदारी सोपवली होती. त्यांची ही निवड औट घटकेची ठरली आहे. गोपीकिशन बाजोरिया यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडे बुलढाणा लोकसभेसह अकोला मतदारसंघाच्या संपर्क प्रमुखपदाची जबाबदारी सोपण्यात आली आहे.

हेही वाचा : “मी साक्षीला आहे, महाविकास आघाडीचं सरकार बनवण्यासाठी एकनाथ शिंदेंनी…”, शशिकांत शिंदेंचं विधान

माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांना भाजपाचे वसंत खंडेलवाल यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे शिवसेनील ( ठाकरे गट ) त्यांचं वर्चस्व कमी झालं होतं. म्हणून महाराष्ट्रात राजकीय घडामोडी घडल्यानंतर बाजोरिया शिंदे गटात दाखल झाले. शिंदे गटात त्यांच्यावर अकोला संपर्क प्रमुखपदाची जबाबदारी सोपण्यात आली होती.

हेही वाचा : प्रतिष्ठा पणाला लावूनही भाजपा-शिंदे गटाचा कसब्यात पराभव, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “कार्यकर्त्यांनी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पण, शिवसेना ( शिंदे गट ) जिल्हाध्यक्ष, महानगराध्यक्ष आणि युवा सेनेचे जिल्हाध्यांसह अन्य पदाधिकाऱ्यांनी बाजोरियांची लेखी तक्रार खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडे केली होती. तसेच, एक पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पाठवलं होतं. त्यानंतर आता, बाजोरिया यांची संपर्क प्रमुखपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.