“अमोल कोल्हे यांनी अकलेचे तारे तोडत उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदी शरद पवार यांच्या आशीर्वादाने आहेत असे वक्तव्य केलं. हे बोलण्याची त्यांची उंची आहे का? कोल्ह्याने उंटाच्या पार्श्वभागाचा मुका घेऊ नये, आपली लायकी काय? आपण बोलतो काय?” अशा शब्दांमध्ये माजी खासदार आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच, “शिवसेनाप्रमुख आणि उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला मोठं केलं आहे. राष्ट्रवादीचे खासदार जरी असाल, तरी प्रकाश झोतात आणण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.” असं देखील आढळराव यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना अमोल कोल्हे यांना उद्देशून म्हटलं म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आढळराव-अमोल कोल्हे संघर्ष पेटला; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत कोल्हेची टीका

शिरूर लोकसभा मतदारसंघातील विकास कामांच्या श्रेयांवरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत संघर्ष उफाळून आला आहे. पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या कामावरून राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आणि शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात ठिणगी पडली असून, आता एकमेकांवर जोरदार टीका टिप्पणी सुरू झाल्याचे दिसत आहे.

शिवसेनेतून मोठा झालेला हाच लबाड कोल्हा, आता…; आढळराव पाटलांचा अमोल कोल्हेंवर पलटवार

या पार्श्वभूमीवर बोलतना माजी खासदार आढळराव पाटील म्हणाले की, “मी खासदार नाही ठीक आहे, पण पुणे – नाशिक बायपास, नारायणगाव या रस्त्याच्या उद्घटनाच्या वेळी फोन तरी करायचा, निमंत्रण द्यायचं. या माणसामुळे काम झालं आहे. यांना बोलवावं. निमंत्रण पत्रिकेत राष्ट्रवादी सोडून इतरांचे फोटो नाहीत. माझी एवढीच माफक अपेक्षा आहे. की, माझ्या मुख्यमंत्र्यांचा फोटो आला पाहिजे होता आणि मला निमंत्रण द्यायला पाहिजे होतं.” असं देखील आढळराव यांनी बोलून दाखवलं आहे.

महाविकासआघाडीत बिघाडीचं काम अमोल कोल्हे आणि दिलीप मोहिते करत आहेत –

पुढे ते म्हणाले की, “महाविकास आघाडीमध्ये बिघाडी कोण करतय? याच्यात कोणी बिघाडी केली? आणि उलट आरोप करता की आम्ही बिघाडी केली. पुणे जिल्ह्यात महाविकास आघाडीमध्ये बिघाडीच काम राष्ट्रवादीचे नेते अमोल कोल्हे आणि दिलीप मोहिते करत आहेत. मी कोणावर टीका केली नाही. अमोल कोल्हे यांनी अकलेचे तारे तोडत उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदावर शरद पवार यांच्या आशीर्वादाने आहेत असे वक्तव्यं केलं. हे बोलण्याची उंची आहे का? कोल्ह्याने उंटाच्या पार्श्वभागाचा मुका घेण्याची ही पद्धत आहे का? आपली लायकी काय? आपण बोलतो काय? ”

उद्या शरद पवार यांच्यावरही टीका करणार का? –

याचबरोबर, “माझं सर्वांशी चांगलं आहे. मोहिते आणि अमोल कोल्हे हे सध्या हवेत आहेत, त्यांना वाटतं आपल्यामुळ सर्व काही चाललं आहे. शिवसेनाप्रमुख आणि उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला मोठं केलं आहे. राष्ट्रवादीचे खासदार जरी असाल तरी प्रकाश झोतात आणण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलंय. शिवसेनेने मोठा बहुमान दिलेला आहे. महत्वाची पदं दिलीत. अशा पद्धतीने पांग फेडत आहात. असं म्हणत, “म्हातारा म्हणून टीका करत आहात माझं वय ६५ आहे. उद्या शरद पवार यांच्यावरही टीका करणार का?” असा देखील सवाल आढळराव यांनी अमोल कोल्हे यांना केला आहे.

तुम्हाला जेवढी स्क्रिप्ट दिली तेवढीच बोला –

अमोल कोल्हे तरूण आहेत मग दीड वर्ष झालं कोंबडी सारख घरात का लपून बसला होता? मी मतदार संघात वणवण फिरत आहे. लोकांच्या मदतीसाठी सकाळी सात ते संध्याकाळ पर्यंत पळतोय. तुम्हाला लोकांनी शुटिंग करण्यासाठी निवडून दिल आहे का? निवडणुकीत म्हटलात लोकांच्या सेवेसाठी हे सर्व सोडेल. आता लोकांना सोडलं आणि शुटिंगमध्ये व्यस्त आहेत. बोलबच्चन गिरी करू नका..महाविकास आघाडीला विरोध नाही. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या संगनमताने सरकार चालत आहे. तुम्हाला जेवढी स्क्रिप्ट दिली तेवढीच बोला. अस टोला देखील यावेळी आढळराव यांनी लगावला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former mp adhalrao patil strongly criticizes mp amol kolhe msr 87 kjp
First published on: 18-07-2021 at 18:46 IST