देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या लातूर हा येथील “देवघर” या निवासस्थानी हनमंतराव पाटील (वय ८५) यांनी रविवारी सकाळी गोळी झाडून आत्महत्या केली. हनमंतराव पाटील हे शिवराज पाटील चाकूरकर यांचे सख्खे चुलत बंधू असून ते मूळचे चाकुर येथील रहिवासी होते.
त्यांनी पुतणे तथा शिवराज पाटील यांचे चिरंजीव शैलेश पाटील यांच्याशी काही विषयांवर चर्चाही केली. त्यानंतर शैलेश पाटील बाथरूम मध्ये गेले तेव्हा हनुमंत पाटील यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. शैलेश पाटील बाथरूममधून बाहेर आले तेव्हा त्यांना हनमंतराव पाटील हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. या आत्महत्याचे कारण अद्याप समोर आलं नाही. लातूर पोलीस तपास करत आहेत.