कुर्ला नेहरूनगर येथून अंबाजोगाई येथे आलेल्या बसमध्ये राहिलेले पार्सल वाहकाने घरी आणल्यानंतर त्यातील रेडिओचा स्फोट झाल्याने वाहकासह त्याची पत्नी, आई व मुलगा जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी बीड जिल्ह्णातील केज तालुक्यातील काळेगाव घाट येथे घडली. मुंबईहून रवाना झालेले दहशतवादविरोधी पथकाचे अधिकारी स्फोटामागील कारणांचा शोध घेत आहेत.अंबाजोगाई आगाराची बस शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास मुंबईहून परत आली. त्यात आढळलेले बेवारस पार्सल निंबाळकर यांनी घरी नेले. त्यातील रेडिओत दोन सेल बसविले व तो चालू करताच भीषण स्फोट झाला. स्फोटात गंभीर जखमी झालेल्यांवर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 1st Dec 2012 रोजी प्रकाशित
मुंबईहून आलेल्या पार्सलचा स्फोट
कुर्ला नेहरूनगर येथून अंबाजोगाई येथे आलेल्या बसमध्ये राहिलेले पार्सल वाहकाने घरी आणल्यानंतर त्यातील रेडिओचा स्फोट झाल्याने वाहकासह त्याची पत्नी, आई व मुलगा जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी बीड जिल्ह्णातील केज तालुक्यातील काळेगाव घाट येथे घडली.
First published on: 01-12-2012 at 04:14 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Four of a family seriously injured as radio explodes