परभणी : राजस्थानी मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटीच्या कच्छी बाजार शाखेने जास्त व्याजाच्या परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची ७६ लाख ३५ हजार ४७९ रुपयांची फसवणूक केल्याबद्दल नानलपेठ पोलीस ठाण्यात या मल्टिस्टेट सोसायटीचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांच्यासह १४ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राजस्थानी मल्टिस्टेट क्रेडीट सोसायटीच्या कच्छीबाजार शाखेद्वारे गुंतवणूकधारकांना बारा ते तेरा टक्के व्याजदराचे आमिष दाखविले जात होते. त्यामुळे काही गुंतवणूकधारकांनी अधिक व्याजाच्या आमिषापोटी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली.

सेवानिवृत्त कर्मचारी अनिल आरबाड यांनी सेवानिवृत्तीनंतर मिळालेली संपूर्ण रक्कम या मल्स्टिस्टेच्या शाखेत गुंतवली. सुरुवातीच्या काळात काही महिने परतावा मिळाल्यानंतर लाभ बंद करण्यात आला. त्याबाबत आरबाड यांच्यासह काही गुंतवणूकधारकांनी संपर्क साधला तेव्हा या खातेदारांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. या व्यवहारात आपली फसवणूक झाली आहे, हे लक्षात आल्यानंतर २१ गुंतवणूकदारांनी नानलपेठ पोलीस ठाण्यात या मल्टिस्टेटच्या अध्यक्षांसह एकूण १४ जणांविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मस्टिस्टेटचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी, उपाध्यक्ष बालचंद्र लोढा, सचिव बद्रीनारायण बाहेती, सहसचिव प्रल्हाद अग्रवाल, कोषाध्यक्ष विजय लड्डा, संचालक अशोक जाजू, सतीश सारडा, अजय पुजारी, प्रेमलता बाहेती, कल्पना बियाणी, नामदेवराव रोडे, कार्यकारी संचालक जगदीश बियाणी, मुख्य कार्यकारी अधिकारी व्यंकटेश कुलकर्णी व परभणीतील शाखा व्यवस्थापक गोपी सोमानी यांच्याविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल केले.