गडचिरोली जिल्ह्यीत चामोर्शी तालुक्यातील तीन शाळकरी मुलींचा वैनगंगा नदी पात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मुली नावेतून नदीपार जात होत्या.त्याचवेळी नाव बुडाली आणि तिघींचा मृत्यू झाला. ही घटना आज मंगळवारी दुपारी घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाघोली येथील सोनी मूकरू शेंडे (१४) समृध्दी ढिवरु शेंडे (१५) व पल्लवी रमेश भोयर (१३) या तीन शाळकरी मुली मंगळवारी दुपारी दुपारी वैनगंगा नदीच्या पात्रात नावेवर (डोंगा) बसून दुसऱ्या काठावर आंबे तोडण्याकरिता जात होत्या. नदीपात्र पार करत असताना नाव (डोंगा) नदीत बुडाल्याने तीनही मुलींचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gadchiroli news chamorshi news three girl drowned in river bmh
First published on: 18-05-2021 at 18:32 IST