खळखळणारे हसू, गालावरून ओघळणारे आसू, कधी कडवा उपहास तर कधी वेदनेचा तीव्र झंकार अशा अनेक भावनांच्या िहदोळ्यांनी उस्मानाबादकरांची संध्याकाळ मंत्रमुग्ध झाली. गझल, गीत व कवितांच्या माध्यमातून मुंबईचे गझलकार चंद्रशेखर सानेकर व कवयित्री भाग्यश्री केसकर यांनी हा नजराणा पेश केला.
सरस भारत साहित्य शास्त्र परिषद, ग्रंथाली प्रशासन व िथक महाराष्ट्र डॉट कॉमच्या वतीने शहरातील मेघमल्हार सभागृहात याचे आयोजन केले होते. ग्रंथालीचे विश्वस्त सुदेश िहगळासपूरकर, िथक महाराष्ट्राचे समन्वयक श्रीधर पाटील, रूचीचे संपादक अरूण जोशी, मोहन खैरे, सुनील बडूरकर यांची उपस्थिती होती.
‘तु गेल्यावर तुझ्यावरी ते हक्क आपला सांगत होते,
तेच लोक हे जित्यापणी जे तुला सारखे टाळत होते’
सानेकरांच्या या गझलेने उपस्थितांना भारावून टाकले.
‘झुंजत झुंजत मेला त्याची फिकीर कोणालाही नाही,
ज्याला नुसते खरचटले ते घाव आपले मोजत होते’
आणि
‘दृश्य पाहिले जेव्हा मी हे अपघाताची शंका आली
ज्यांचे पायच वाळूचे ते डोंगर घेऊन चालत होते’
या दोन्ही शेरांना भरभरून दाद मिळाली.
कवयित्री भाग्यश्री केसकर यांनी सादर केलेल्या भावकवितांवर उपस्थितांनी ठेका धरला. लयदार तालावर आणि आशयघन सादरीकरणावर कवितांचा माहोल चांगलाच रंगला.
खंदे वाहक मी वाट पाहतेय त्या पावसाची, माहेरची सय या कवितांनी उपस्थितांच्या मनाचा ठेका घेतला.
रानी वाळी बाभळ
काल विकली जांभळं,
गाठ घालण्या कर्जाची
किती करू धावपळ
माझी जिंदगी झालीय सावकाराचं बासंन,
उर फाटलेलं माझं तरी जगतो हसून
ही शेतकऱ्यांच्या आयुष्यातील संकटांची मालिका व्यक्त करणारी कविता सभागृहाला भावूक करून गेली. सानेकरांच्या अनेक गझलांनी एकाच वेळी हशा तर दुसऱ्या क्षणी दुखाच्या छटा रसिकांच्या मनात पेरल्या.
‘सरस भारत’च्या या उपक्रमाचे िथक महाराष्ट्रचे समन्वयक श्रीधर पाटील यांनी कौतुक केले. भविष्यात ग्रंथाली व िथक महाराष्ट्र डॉट कॉमच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या उपक्रमात सरस भारत साहित्य शास्त्र परिषदेला सोबत घेतले जाईल, असे त्यांनी जाहीर केले. अॅड. राज कुलकर्णी यांनी प्रास्ताविक, तर रवींद्र केसकर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी माधव इंगळे, दौलत निपाणीकर, प्रवीण पवार, दयानंद माने यांनी परिश्रम घेतले.