हावडा-मुंबई सुपरफास्ट गीतांजली एक्स्प्रेसला १५ दिवसात दुसऱ्यांदा होणारा अपघात बुधवारी जागरूक प्रवासी व इंजिन चालकाच्या समयसूचकतेमुळे टळला.
गीतांजली एक्स्प्रेसला मनमाड रेल्वे स्थानकावर थांबा नाही. या गाडीच्या इंजिनाजवळील मालवाहू बोगीमध्ये क्षमतेपेक्षा अधिक वजन झाल्याने ती बाहेरील बाजूने झुकल्याचे प्रवाशांच्या निदर्शनास आले. त्यानंतर चालकानेही प्रसंगावधान राखून मनमाड स्थानकावर गाडी थांबविली. गाडीची संपूर्ण तपासणी करून ती बोगी बाजूला करण्यात आली. सायंकाळी चार वाजून ३५ मिनिटांनी आलेली गाडी पावणेदोन तासाच्या विलंबानंतर सहा वाजून १० मिनिटांनी येथून रवाना झाली.