scorecardresearch

Premium

“उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक लढवावी, अन्…”, भाजपा मंत्र्याचं आव्हान

“पंतप्रधान मोदींवर बोलताना उद्धव ठाकरेंनी थोडं भान ठेवलं पाहिजे,” असेही भाजपा नेत्याने सुनावलं.

uddhav thackeray
लोकसभा निवडणूक लढवण्याचं गिरीश महाजनांचं उद्धव ठाकरेंना आव्हान

मी खुलेआम काँग्रेसबरोबर गेलो होतो. तुमच्यासारखं अर्धा रात्री लपून-छपून बैठका घेतल्या नव्हत्या. आम्हाला काँग्रेसबरोबर जाण्यास मजबूर कुणी केलं? असा सवाल शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला विचारला होता. यावर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तुमच्यात हिंमत होती, तर निवडणुकीपूर्वी जायचं होतं, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

गिरीश महाजन म्हणाले, “तुमच्यात हिंमत होती, तर निवडणुकीपूर्वी काँग्रेसबरोबर जायचं होतं. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शाह आणि फडणवीसांनी केलेल्या प्रचारानंतर तुमचे १८ खासदार निवडून आले. तुमच्या नावावर खासदार निवडून आले नाहीत. तुमच्यात हिंमत असेल, तर लोकसभा निवडणुकीला उभे राहा. आणि फक्त २ खासदार निवडून आणावे.”

syama prasad mookerjee
”३७० जागा जिंकणं श्यामाप्रसाद मुखर्जींना श्रद्धांजली”; पंतप्रधान मोदी असं का म्हणाले?
Pm Modi Speech
“भाजपाला तिसऱ्यांदा सत्तेत यायचं आहे कारण…”, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाजपाच्या अधिवेशनात वक्तव्य
narendra modi loksabha
काँग्रेसवर सडकून टीका, घराणेशाहीचे आरोप, विजयाचा विश्वास; १७ व्या लोकसभेतील पंतप्रधानांच्या शेवटच्या भाषणातील पाच मुख्य मुद्दे
pm modi criticized only congress
लोकसभेतील भाषणात पंतप्रधान मोदींची केवळ काँग्रेसवर टीका; आगामी निवडणूक भाजपा विरुद्ध काँग्रेस करण्याचा प्रयत्न?

हेही वाचा : “…तर त्यांना कोकणवासीय जनतेला देशद्रोही म्हणायचे असेल”, आदित्य ठाकरेंचं ‘त्या’ भाजपा नेत्याला प्रत्युत्तर

“बाळासाहेब ठाकरे एवढी मोठी शिवसेना तुमच्याकडं सोपवून गेले, तुम्ही काय ठेवलं? तुमच्या तानाशाही आणि हुकूमशाहीमुळे खासदार आणि आमदार राहिले नाहीत,” अशी टीका गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

“पंतप्रधान मोदींवर बोलताना उद्धव ठाकरेंनी थोडं भान ठेवलं पाहिजे. राम मंदिर मोदींनी नाहीतर न्यायालयाने बनवलं असं उद्धव ठाकरे सांगतात. पण, ठाकरेंकडे बघून काय बोलावे? हेच समजत नाही,” असा टोलाही गिरीश महाजन यांनी लगावला आहे.

हेही वाचा : प्रियंका चतुर्वेदींबाबत संजय शिरसाटांनी केलेल्या ‘त्या’ दाव्यावर आदित्य ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले, “अशा…”

“करोना काळात मंदिर बंद ठेवण्यात आली. कुणाच्या सांगण्यावरून तुम्ही मंदिर उघडत नव्हता? भाजपाने आंदोलन केल्यावर तुम्ही मंदिरे सुरु केली. म्हणून तुम्ही बेगडी हिंदुत्वावर बोलू नका,” अशा शब्दांत गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांना सुनावलं आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Girish mahajan attacks uddhav thackeray over pm narendra modi statement challenge loksabha election ssa

First published on: 30-07-2023 at 14:03 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×