scorecardresearch

Premium

प्रियंका चतुर्वेदींबाबत संजय शिरसाटांनी केलेल्या ‘त्या’ दाव्यावर आदित्य ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले, “अशा…”

संजय शिरसाट यांनी केलेल्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

aaditya thackeray priyanka chaturvedi sanjay shirsat
प्रियंका चतुर्वेदींबाबत संजय शिरसाटांनी केलेल्या दाव्यावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

प्रियंका चतुर्वेदी या काँग्रेसच्या होत्या. पण, शिवसेनेत आल्यावर प्रियंका चतुर्वेदी यांची सुंदरता पाहून आदित्य ठाकरे यांनी त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली, असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटल्याचा दावा शिवसेना ( शिंदे गट ) आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. याला आता आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अशा सडक्या विचारांचे लोक राजकारणात टिकले कसे? असा संतप्त सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

संजय शिरसाट काय म्हणाले?

“ठाण्यातील मेळाव्यात राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी गद्दारांना क्षमा नाही, असं म्हटलं. प्रियंका चतुर्वेदी या काँग्रेसच्या प्रवक्त्या होत्या. तिथून शिवसेनेत आल्यावर चंद्रकांत खैरे यांनी सांगितलं की, ‘प्रियंका चतुर्वेदींची सुंदरता पाहून आदित्य ठाकरे यांनी राज्यसभेची उमेदवारी दिली.’ त्या प्रियंका चतुर्वेदी आता दुसऱ्यांना गद्दार म्हणतात,” असं संजय शिरसाट यांनी म्हटलं होतं.

Prashan kishor and nitish kumar
“नितीश कुमारांना शिव्या देणारे भाजपा समर्थक आज…”, प्रशांत किशोर यांचा टोला; म्हणाले, “पलटूरामांचे सरदार…”
inspirational story kalpana-saroj
बाराव्या वर्षी लग्न, सासरच्यांकडून छळ; दोन रुपयांपासून कमाईला सुरुवात करणाऱ्या कल्पना सरोज ९०० कोटींच्या मालकीण बनल्या कशा?
man commits suicide after wife sister in law asking money for liquor
पिंपरी : दारूसाठी पैसे मागणाऱ्या पत्नी, मेहुणीच्या त्रासाला कंटाळून देहूरोडमध्ये तरुणाची आत्महत्या
european travellers
भारताला भेट दिलेल्या युरोपियन प्रवाशांनी अयोध्या आणि श्रीरामाबद्दल काय लिहिले? वाचा..

हेही वाचा : “आपल्याला गद्दारांना गाडायचं आहे”, उद्धव ठाकरेंच्या विधानावर शिंदे गटाचं प्रत्युत्तर; म्हणाले…

शिरसाट यांच्या वक्तव्यावर वरळीत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीने आदित्य ठाकरे यांना विचारलं. त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले, “गद्दार आमदारांची किंमत त्यांना कळली आहे. अशा सडक्या विचारांचे लोक राजकारणात टिकले कसे? हा प्रश्न पडतो. याचं दु:ख देखील होतं. पण, जनता त्यांना जागा दाखवेल.”

‘उद्धव ठाकरे यांनी प्रकल्पांना विरोध करून भांडवल केलं’, असं संजय शिरसाट म्हणाल्याच्या प्रश्नावर आदित्य ठाकरे यांनी म्हटलं की, “ज्यांना जेवढी किंमत आहे, तेवढीच देऊया. जास्त बोलून त्यांना मोठं करणे योग्य नाही. त्यांच्या गटात त्यांना जिथे ठेवायचं आहे, तिथे ठेवलं आहे.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Aaditya thackeray reply sanjay shirsat over priyanka chaturvedi chankant khaire comment ssa

First published on: 30-07-2023 at 12:34 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×