आता खोक्याचं राज्य सुरू झालं आहे. पैसा, माज, मस्ती आली आहे. हा माज आणि मस्ती उतरवण्याची वेळ आली आहे, असं टीका विधान राष्ट्रवादीचे नेते, आमदार एकनाथ खडसे यांनी राज्य सरकारवर केली होती. याला मंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. एकनाथ खडसे यांची मस्ती अजून जिरली नाही का? आमची मस्ती काढत आहेत, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं.

एकनाथ खडसे काय म्हणाले?

“जळगावात सर्व पक्षांचे आमदार माझ्याविरोधात एकत्र आलेत. आम्ही अधिकारी भ्रष्ट असल्याचं पुराव्यासह विधानसभेत दिले होते. मग, मंत्र्यावर दडपण आणून अधिकाऱ्यावर कारवाई करू दिली नाही. भ्रष्ट लोक आहेत. खोकेवाले आले आहेत. आता खोक्यांचं राज्य सुरू केलं आहे. पैसा, माज, मस्ती आली आहे. हा माज आणि मस्ती उतरवण्याची वेळ आली आहे,” असं टीकास्र एकनाथ खडसे यांनी सोडलं होतं.

हेही वाचा : “…तर पंकजा मुंडेंबरोबर युती करू”, बच्चू कडू यांचं मोठं विधान

“…त्याची फळ तुम्ही भोगत आहात”

यावर गिरीश महाजन म्हणाले, “एकनाथ खडसे यांची मस्ती अजून जिरली नाही का? आमची मस्ती काढत आहेत. १०-१० मंत्रीपद घेताना तुम्हाला काही वाटलं नाही का? तुमची मस्ती लोकांनी आणि सर्व बांधकाम व्यावसायिकांनी पाहिली आहे. त्याची फळ तुम्ही भोगत आहात. उर बडबून काही उपयोग नाही.”

हेही वाचा : “…तर मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ देणार नाही”, विजय वडेट्टीवार यांची ठाम भूमिका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“तुमची मस्ती लोकांनी उतरवली आहे”

“३०-३५ वर्षे तुम्ही भाजपात होता. सगळ्यात जास्त पदं तुम्ही भोगली आहेत. आता दोन वर्षात तुम्हाला आमची मस्ती दिसली का? तुमची मस्ती लोकांनी उतरवली आहे. तुमचा विधानसभेत पराभव केला, दूध संघ आणि बँकेतून हाकललं, तुमचं काय राहिलं आहे. आम्ही आमच्या ठिकाणी योग्य आहे,” असं गिरीश महाजनांनी सांगितलं.