पडळकरांच्या वाहनावर सोलापुरात दगडफेक

शहराच्या भवानी पेठ-मड्डी वस्ती भागात रात्री आठच्या सुमारास हा प्रकार घडला.

gopichand padalkar vehicle stone pelting
सोलापुरात गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगडफेक

सोलापूर : भाजपचे विधान परिषद सदस्य तथा धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांच्या मोटारीवर सोलापुरात समाजकंटकाने दगडफेक केली. दरम्यान, या घटनेची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

शहराच्या भवानी पेठ-मड्डी वस्ती भागात रात्री आठच्या सुमारास हा प्रकार घडला. आमदार पडळकर हे बुधवारी सोलापुरात आले होते. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. सायंकाळी भवानी पेठेत धनगर समाजाच्या घोंगडी बैठकीसाठी ते जात असताना त्यांच्या मोटारीवर एका अज्ञात समाजकंटकाने दगडफेक केली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. मोटारीचे किरकोळ नुकसान झाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Gopichand padalkar member of legislative council and leader of dhangar samaj on the car stone throwing akp

ताज्या बातम्या