शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज ६३ वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त ठाकरे गटाने त्यांची एक मुलाखत प्रसारित केली आहे. खासदार आणि ‘सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्राचे संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे. ही मुलाखत दोन भागांमध्ये प्रसारित करण्यात आली. आज या मुलाखतीचा दुसरा भाग प्रसारित करण्यात आला. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी अनेक राजकीय घडामोडींवर भाष्य केलं आहे. सत्ताधारी भाजपावर टीका केली, तर शिवसेनेच्या शिंदे गटावर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांच्या या मुलाखतीवर राजकीय प्रतिक्रिया येत आहेत.

भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवरून जोरदार टीका केली आहे. पडळकर म्हणाले, ती मुलाखत काही मी बघितली नाही, तुमच्याकडून (प्रसारमाध्यमं) त्यातले विषय कळतात. मी गावाकडचा कार्यकर्ता आहे. आमच्या गावाकडे जत्रा असतात आणि त्या जत्रेत तमाशाचा कार्यक्रम असतो. या कार्यकर्मात वघनाट्य असतं जे खूप लोकप्रिय आहे. त्या वघात एक राजा असतो आणि एक वजीर असतो. उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी संजय राऊत यांची अवस्था त्या तमाशातल्या वघनाट्यामधील राजा आणि वजीरासारखी झाली आहे.

हे ही वाचा >> “अजित पवार नक्कीच मुख्यमंत्री होणार”, प्रफुल्ल पटेलांच्या वक्तव्यावर गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गोपीचंद पडळकर म्हणाले, रात्रींचं वघनाट्य एकदम जोरात असतं. परंतु सकाळी परिस्थिती तशी राहत नाही. सकाळची परिस्थिती वेगळी असते. त्या वघातल्या राजा आणि वजीरासारखी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची परिस्थिती आहे. ते (उद्धव ठाकरे) आता तमाशातले राजे आहेत. परंतु सकाळची परिस्थिती पूर्णपणे वेगळी असते. त्यांच्या माध्यमातून राज्यात मोठी करमणूक होत आहे. त्याकडे राज्यातले लोक फार गांभीर्याने पाहत असतील असं मला वाटत नाही.