विविध कारणांमुळे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन लांबणीवर गेले आहे. त्यामुळे आता राज्याचे हिवाळी अधिवेशन येत्या डिसेंबर अखेरीस होणार आहे. दरम्यान, हिवाळी अधिवेशन प्रथा-परंपरेप्रमाणे नागपूरला होत असते, पण मुख्यमंत्र्यांच्या  तब्येतीमुळे हे अधिवेशन मुंबईतच होणार आहे. याबाबत झालेल्या  बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“नेहमीप्रमाणे अधिवेशन न घेण्याचा या सरकारची आतापर्यंतची राहिली आहे आणि त्याप्रमाणेच चार ते पाच दिवसांचे अधिवेशन ठेवण्यात आले आहे. एकूण कामकाजाचे पाच दिवस आहेत आणि त्यातील पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव मांडले जाणार आहेत. त्यामुळे हे चार दिवसांचे अधिवेशन आहे. एका दिवसात पुरणवणी मागण्यांवर चर्चा आणि त्याला मंजूरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारकडे आम्ही अधिवेश वाढवण्याची मागणी केली होती. प्रश्नांना सामोरे जाण्याची आणि अधिवेशन घेण्याची मानसिकता सरकारची दिसत नाही,” असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

“दोन वर्षात अतारांकित प्रश्नाला उत्तर दिलं नाहीत यावर मी प्रचंड नाराजी व्यक्त केली. यासाठी तर अधिवेशन लागत नाही. दोन वर्षांच्या अधिवेशाच्या प्रत्येक बैठकीत हा विषय मांडून एकाही अतारांकित प्रश्नाला सरकारने उत्तर दिलेले नाही. सरकारने बैठक घेऊन दोन वर्षातील प्रलंबित अतारांकित प्रश्नांवर उत्तरे देण्याचे आश्वासन दिले आहे,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. किमान या अधिवेशनात लक्षवेधी लावा म्हणून आग्रह धरला ते त्यांनी मान्य केला असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“अधिवेशाच्या संदर्भात राज्य सरकारची भूमिका बोटचेपी दिसत आहे. त्यांना प्रश्नांना सामोरं जायचं नाहीये हे स्पष्ट दिसत आहे. नागपूरात दोन वर्षे अधिवेशन झालं नाही. विदर्भातील लोकांची फडसवणूक झाली आहे असं त्यांना वाटत आहे. मुख्यमंत्री प्रवास करू शकत नाही त्याबाबत सरकारने विनंती केल्याने आम्ही सकारात्मक भूमिका घेतली. पण मार्च मध्ये होणारे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे नागपूरला घेण्याची मागणी आम्ही केली आहे. बैठकीत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करुन अधिवेशन नागपूरला घेण्याचे आश्वासन सरकारने दिलं आहे. पण आजच्या बैठकीवर मी निराश आहेस.  संसदीय कामकाजात या सरकारला कुठलाही रस नाही, हे बैठकीवरुन स्पष्ट झाले आहे,” असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Government does not want to face the problem devendra fadnavis after the winter session meeting abn
First published on: 29-11-2021 at 12:47 IST