गावातील साठीनंतरच्या पिढीला शिक्षित करण्याचा संकल्प मुरबाडजवळील नाणेघाटाच्या पायथ्याशी असलेल्या फांगणे गावातील ग्रामस्थांनी केला. दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या प्रयत्नांची दखल बघता बघता राष्ट्रीयच नाही तर आंतराष्ट्रीय पातळीवरदेखील घेतली गेली. अनेकांना या शाळेबद्दल कुतूहल निर्माण झालं तर काहींनी ग्रामस्थांच्या प्रयत्नांचं कौतुकही केलं. ६० हून अधिक वय असलेल्या या आजीबाईंच्या शाळेची नोंद आता लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गावातील जुनी पीढी ज्यांचं शिक्षण काही कारणांमुळे अपूर्ण राहिलं अशा पिढीला सुशिक्षित करण्याच्या संकल्पनेतून ही शाळा सुरू झाली. या गावात गेल्या काही काळापासून शिक्षण आणि स्वच्छतेचे आदर्श उपक्रम सुरू आहेत. गावातील ज्येष्ठ नागरिकांना किमान अक्षर ओळख आणि आकडेमोड करता यावी, याहेतूने कै. मोतीराम गणपतदादा चॅरिटेबल ट्रस्ट आणि जिल्हा परिषद शाळा फांगणे यांच्या प्रयत्नाने ही शाळा सुरू झाली. विशेष म्हणजे गावातील ज्येष्ठ महिलांनी या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला.

हातात दप्तर, पाटी, पुस्तक घेऊन रोज नवीन काही शिकायला मिळेल या उद्देशानं आजी शाळेत येतात. सुरुवातीला २८ आजीबाई आनंदानं शाळेत शिक्षणासाठी येत. दररोज दुपारी २ ते ४ या वेळेत ही शाळा भरते. या शाळेतील विद्यार्थ्यांचे वय किमान ६० ते ९० या दरम्यान आहे. आजींचं वय जास्त असलं तर प्रत्येकांची नवीन काहीतरी शिकण्याची इच्छाशक्ती जबरदस्त आहे. आता या शाळेची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाल्यानं आंतराष्ट्रीय पातळीवरदेखील अनेकजण या शाळेची दखल घेत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Grannys school located in fangane village at murbad in thane district set limca book of records
First published on: 23-02-2018 at 16:05 IST